एका तरूणीने पिझ्झा मागवल्यानंतर तो शिळा आणि अर्धवट खाल्लेला आल्याने एक पोस्ट केली आहे. एक्सवर केलेली तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ही तरूणी म्हणते की ४५० रूपये खर्च करून झोमाटोवरून पिझ्झा मागवला. पण तो आला तेव्हा अर्धवट खाल्लेला होता आणि शिळाही होता. या तरूणीने या पिझ्झाचे फोटोही पोस्ट केले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

@Itsbebo__या एक्स पोस्टवरून एका तरूणीने पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने पिझ्झाचे फोटो पोस्ट केले आहेत. हा फोटो अर्धवट खाल्लेल्या पिझ्झाचा आहे. तसंच त्या खोक्याचाही फोटो पोस्ट केला आहे ज्या खोक्यात हा पिझ्झा आला आहे. तिने असं म्हटलं आहे की मी सकाळी १०.३० वाजता पिझ्झा ऑर्डर केला होता. त्यानंतर ४५ मिनिटं मला वाट बघावी लागली आणि मग पिझ्झा आला. हा पिझ्झा फक्त उशिरा आला नाही तर मी जेव्हा तो उघडून पाहिला तेव्हा तो अर्धवट खाल्लेला होता. तसंच तो शिळाही होता. मी झोमाटोवरून हा पिझ्झा मागवला होता. मी त्यांना पोस्ट करून सांगितलं की हा पिझ्झा ४५० रूपये खर्च करून मागवला होता. हा पिझ्झा दिलेल्या वेळेपेक्षा ४५ मिनिटं उशिरा आला.

या तरूणीने पुढे काय म्हटलं आहे?

या तरूणीने पुढे असं म्हटलं आहे की एखाद्या रेस्तराँमधून पिझ्झा मागवल्यानंतर तो असा कसा काय पाठवला जाऊ शकतात? अर्धवट खालेल्ला पिझ्झा कसा काय पाठवला असेल? मी काही कुणावर आरोप करत नाही. पुरावा तुमच्यासमोर आहे. मला झोमाटोवरून आलेला पिझ्झा अर्धवट खालेल्ला आणि शिळा होता. News 18 ने हे वृत्त दिलं आहे.

झोमाटोने याबाबत काय म्हटलं आहे?

या प्रकरणी झोमाटोने म्हटलं आहे की आम्ही या घटनेची दखल घेतली आहे. आम्ही या प्रकरणाची चौकशी करू असं आमच्याकडून ऑर्डर केल्यावर घडायला नको तरीही घडलं आहे त्याबाबत आम्ही दिलगीर आहोत असं कंपनीने म्हटलं आहे.

सोशल मीडियावर प्रतिक्रिया काय?

या तरूणीने केलेल्या पोस्टनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. ४५० रूपये खर्च करून पिझ्झा मागवल्यानंतर अशा पद्धतीने पिझ्झा कोण पाठवतं? तू एक तक्रार कर आणि या गोष्टीची नुकसान भरपाई घे असं एका युजरने म्हटलं आहे. तर दुसऱ्या युजरने म्हटलंय की मलाही एकदा असाच अनुभव आला होता. मी पिझ्झासाठी ३९० रुपये घालवले होते. जेव्हा तो पिझ्झा घरी आला तेव्हा अर्धवट खालेल्ला होता. मी जेव्हा तक्रार केली तेव्हा मला त्यांनी नुकसान भरपाई म्हणून ३८ रूपये दिले होते. आणखी एका युजरने म्हटलं आहे की ४५० रूपयांचा पिझ्झा मागवला आणि तो असा आला? याची रितसर तक्रार कर.