संतापजनक! महिला कॉन्स्टेबलवर तिघांनी बलात्कार करत रेकॉर्ड केला व्हिडिओ; गुन्हा दाखल

एका महिला कॉन्स्टेबलवर तीन जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घडली आहे. आरोपींनी या कृत्याचा व्हिडिओ शूट केला आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे.

Student Gang Raped Boyfriend Thrashed By Robbers Near Mysore
(प्रातिनिधीक छायाचित्र)

राज्यात आणि देशभरात गेल्या काही दिवसांत बलात्काराच्या अनेक घटना घडल्या. नुकतीच एक घटना मध्य प्रदेशच्या नीमच जिल्ह्यातून समोर आली आहे. याठिकाणी एका महिला कॉन्स्टेबलवर तीन जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घडली आहे. आरोपींनी या कृत्याचा व्हिडिओ शूट केला आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि त्याच्या आईला अटक करण्यात आली आहे, तर इतर तिघे फरार आहेत, असे महिला पोलीस ठाण्याच्या प्रभारी अनुराधा गिरवाल यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पवनने या वर्षाच्या सुरुवातीला फेसबुकवर महिला कॉन्स्टेबलशी मैत्री केली आणि तिच्याशी व्हॉट्सअॅपवर चॅटिंग सुरू केली. त्यानंतर ते लवकरच प्रत्यक्ष आयुष्यात भेटू लागले. आरोपी पवन हा नीमचमधील मनसा शहरातील रहिवासी असून पीडितेला भेटायला इंदूरला गेला होता. नंतर पवनने पीडितेला त्याचा भाऊ धीरेंद्रच्या वाढदिवसासाठी मनसा येथे आमंत्रित केले. पवनच्या घरी, त्याचा भाऊ धीरेंद्र आणि विजय यांनी महिला कॉन्स्टेबलवर बलात्कार केला. या कृत्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिली. पीडितेने पवन घरी आल्यावर त्याला घडलेला प्रकार सांगितला तेव्हा त्यानेही तिच्यावर बलात्कार केला, असं पीडितेनं जबाबात म्हटलंय.

पीडितेने आरोपीच्या आईकडे यासंदर्भात तक्रार केली, तेव्हा वृद्ध महिलेने तिला धमकी दिली आणि तिने या घटनेबद्दल इतर कोणालाही सांगितले तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, असं म्हटलं. तसेच आरोपीच्या नातेवाईकाने पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली आणि तिच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला, असा दावाही तिने केला आहे. त्यानंतर पीडितेने महिला पोलीस स्टेशन गाठले आणि घटनेची माहिती देत लेखी तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पवन आणि त्याच्या आईला अटक केली आहे. तसेच धीरेंद्र, विजय आणि त्यांच्या काकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६, २७६ ड आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन फरार आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Woman constable gang raped in neemuch madhya pradesh 2 accused arrested hrc

ताज्या बातम्या