२ वर्षाच्या मुलीला महिला कारमध्ये विसरली, ७ तासांनी परतली तर…

लोक बर्‍याचदा कारमध्ये सामान विसरतात, एक महिला कारमध्ये दोन वर्षाच्या निरागस मुलीला विसरली

woman forgets 2 year old daughter in the car and she comes back after 7 hours
(प्रातिनिधिक फोटो) photo pixabay

लोक बर्‍याचदा कारमध्ये सामान विसरतात, परंतु अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये एक महिला कारमध्ये दोन वर्षाच्या निरागस मुलीला विसरली. यावेळी मुलीला सीट बेल्ट घातला होता. महिलेने कार पार्क केली आणि ती घरी गेली. सात तासानंतर जेव्हा ती परत आली तेव्हा तिला मोठा धक्का बसला. गाडीत त्या निष्पाप मुलीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी महिलेला अटक केली आहे.

फ्लोरिडा येथील ४३ वर्षीय जुआना पेरेझ-डोमिंगो यांना शनिवारी पोलिसांनी अटक केली. यांच्यावर दोन वर्षांच्या मुलीला सात तास कारमध्ये सीट बेल्टने बांधले व त्यामुळे मुलीचा मृत्यू झाला, असा आरोप करण्यात येत आहे.

एनबीसी मियामीच्या अहवालानुसार, दोन वर्षांच्या मुलीचे नाव जोसेलीन मारिट्झा मेंडेझ आहे. या मुलीला डे केयरवर  नेण्याची जबाबदारी महिलेची होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

शुक्रवारी आरोपी महिला दोन वर्षांची मुलीला डे केअरवर नेण्यासाठी आली. मात्र, डे केअर ६ वाजून ३० मिनीटांनी सूरू नव्हते. त्यामुळे ती मुलीला स्वताच्या घरी घेऊन गेली. दरम्यान, ती मुलीला कारमध्ये विसरली.

हेही वाचा- Video : मुंबईत पावसाच्या पाण्यात आलं हरीण; पुढे काय झालं बघा…

३० डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात कारच्या आत बसलेल्या मुलीची प्रकृती खराब झाली. जेव्हा पेरेझ-डोमिंगो ३ वाजण्याच्या सुमारास कारजवळ परत आली तेव्हा मुलीचा आधीचं मृत्यू झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने आपत्कालीन सेवा कॉल करण्याऐवजी तिने मुलीच्या आईला बोलावून तिच्या मृत्यूची माहिती दिली.

यानंतर आरोपी महिला मुलीचा मृतदेहासह तिच्या घरी पोहोचली. तेथून पोलिसांनी मुलीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला. त्याचबरोबर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Woman forgets two year old daughter in the car and she comes back after 7 hours srk

Next Story
चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी
ताज्या बातम्या