हैदराबादमधील २७ वर्षीय तरुणीला एका लहानमुलावर लैंगिक अत्याचर केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे. या मुलीने एका शाळकरी मुलावर शाळेमध्येच लैंगिक अत्याचार केले होते. या प्रकरणामध्ये बलात्कार आणि लहान मुलांना संरक्षण देणाऱ्या पॉक्‍सो कायद्याअंतर्गत सुनावणी झाली. विशेष न्यायालयामध्ये झालेल्या सुनावणीत या तरुणीला २० वर्षांच्या तुरुंगवासाची सिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच तिला २० हजारांचा दंडही ठोठावण्यात आलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरोपी महिलेचं नाव ज्योति उर्फ मंजुळा असं आहे. या शाळेमध्ये हा मुलगा शिकतो तिथेच ही महिला केअरटेकर म्हणजेच मुलांची काळजी घेणारी महिला शिपाई म्हणून काम करायची या प्रकरणामध्ये चंद्रयानगुट्टा पोलीस स्थानकामध्ये डिसेंबर २०१७ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला. मुलाच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करुन घेण्यात आला होता. पोलिसांनी महिलेविरोधात पॉक्सोसोबतच आयपीसीअंतर्गत येणाऱ्या काही गंभीर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

आपल्या तक्रारीमध्ये मुलाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार मुलाच्या शरीरावर चटक्यांचे व्रण दिसून आल्यानंतर हा प्रकार उघढकीस आला. आपण मुलाकडे यासंदर्भात चौकशी केली असता शाळेतील केअरटेकर आपल्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करते असं मुलाने सांगितल्याचं तक्रारदाराने म्हटलं आहे. ही महिला नुकतीच शाळेत कामाला लागली होती आणि नेहमीच ती आपल्यासोबत अशी वर्तवणूक करते असं या मुलाने त्याच्या वडिलांना सांगितलं. घडलेल्या प्रकारासंदर्भात कुठेही वाच्यता करायची नाही. या बद्दल कुठेही बोललास तर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी या महिलेने मुलाला दिल्याचं पोलिसांनी म्हटलंय. इतक्यावरच न थांबता या महिलेने मुलाला सिगारेटचे चटकेही दिल्याचा उल्लेख आरोपपत्रात आहे. मात्र घडलेला प्रकार पालकांना सांगण्यापासून हा मुलगा घाबरत होता.

नंतर ही महिला या मुलाचं लैंगिक शोषण करु लागली. तिने अनेकदा या मुलासोबत लैंगिक चाळे करुन त्याचं शोषण केल्याचं पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं. ही महिला अत्याचार केल्यानंतर या मुलाला धमकावत असल्याने त्याने त्याच्या वडिलांचं लक्ष अंगावरील चट्ट्यांकडे जाईपर्यंत काहीच आपल्या घरी सांगितलं नव्हतं. या प्रकरणामध्ये पब्लिक प्रॉसिक्युटर आयशा रफात यांनी न्यायालयासमोर पिडीत मुलाची बाजू सविस्तरपणे मांडली. या प्रकरणामधील आरोपपत्र आणि घडलेला घटनाक्रम ऐकून घेतल्यानंतर प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत न्यायालयाने निकाल दिला. या निकालामध्ये न्यायालयाने या महिलेला २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावतानाच २० हजारांचा दंडही ठोठावला आहे. या प्रकऱणामुळे पुन्हा एकदा मुलांच्या शाळेतील सुरक्षेसंदर्भातील मुद्दा चर्चेत आलाय.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman gets 20 years in jail for sexually abusing boy at school scsg
First published on: 17-09-2021 at 15:17 IST