scorecardresearch

संतापजनक! महिलेवर तिच्या अडीच वर्षाच्या मुलासमोर मांत्रिकाचा ७९ दिवस बलात्कार; पोलिसांनी केली सुटका

पोलिसांनी या पीडित महिलेची सुटका केली असून आरोपी मांत्रिक फरार झाला आहे.

Rape, Gangrape,
(प्रातिनिधीक छायाचित्र)

एका महिलेवर तिच्या अडीच वर्षाच्या मुलासमोर मांत्रिकानं बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मांत्रिकानं तिच्यावर सतत ७९ दिवस बलात्कार केल्याचा आरोप महिलेनं केलाय. शुक्रवारी पोलिसांनी या पीडित महिलेची सुटका केली असून आरोपी मांत्रिक फरार झाला आहे. ओडिशातील बालासोर जिल्ह्यात ही घटना घडली.

ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात एका मध्यमवयीन विवाहित महिलेवर तिच्या अडीच वर्षांच्या मुलासमोर एका मांत्रिकाने ७९ दिवस वारंवार बलात्कार केला. पोलिसांनी पोलिसांनी शुक्रवारी बंद खोलीतून महिलेची आणि तिच्या मुलाची सुटका केली, मात्र आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला असून त्याला पकडण्यासाठी शोध सुरू करण्यात आला आहे.

पीडित महिलेने तिच्या पोलीस तक्रारीत आरोप केला आहे की, पती आणि सासरच्यांनी तिला त्यांच्यातील वैवाहिक कलह सोडवण्यासाठी मांत्रिकासोबत राहण्यास भाग पाडले. या महिलेचं २०१७मध्ये लग्न झालं होतं. तेव्हापासून हुंड्यासाठी सासरच्या लोकांकडून शारीरिक आणि मानसिक छळ होत होता, असा आरोप तिने केलाय. दरम्यान, ही महिला जर माझ्यासोबत काही महिने राहिली तर मी हा कलह दूर करेन, असं मांत्रिकाने महिलेच्या कुटुंबीयांना सांगितलं. महिलेने नकार दिल्यानंतर तिच्या सासूने तिला बेशुद्ध केली. महिला शुद्धीवर आल्यानंतर ती मुलासमवेत मांत्रिकाच्या खोलीत होती, त्यानंतर तब्बल ७९ दिवस मांत्रिकाने रोज तिच्यावर बलात्कार केला, असा आरोप पीडितेनं केलाय.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार २८ एप्रिल रोजी मांत्रिक त्याचा मोबाईल फोन खोलीत विसरला होता. त्या फोनवरून पीडितेने तिच्या माहेरी या घटनेबद्दल सांगितलं. त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. परंतु मात्र पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत मांत्रिक पळून जाण्यात यशस्वी झाला होता. दरम्यान, आरोपीचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Woman raped by mantrik for 79 days in front of minor son in odisha hrc

ताज्या बातम्या