अमेरिकेमधील बाल्टीमोर शहरातून मियामीला जाणाऱ्या एका विमानात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका प्रवासी महिलेने अचानक विवस्त्र होऊन प्रवाशांसमोर अश्लील कृत्य केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर विमानात मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर अखेर त्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.
घटना काय घडली?
अमेरिकेमधील बाल्टीमोर शहरातून मियामीला एक विमान जात होतं. विमानाने उड्डाण केल्यानंतर एका प्रवासी महिलेने अचानक विवस्त्र होऊन प्रवाशांसमोर अश्लील कृत्य केल्याचा प्रकार घडला. त्यामुळे विमानात एकच गोंधळ निर्माण झाला. या घटनेनंतर विमानातील क्रू सदस्यांनी कॉकपिटला सूचित केलं.
त्यानंतर क्रू सदस्यांनी एअरलाइनच्या ऑपरेशन्स टीमला देखील या घटनेची माहिती दिली. त्यानंतर विमान खाली उतरल्यानंतर अखेर कायदेशीर करावाई करत पोलिसांनी संबंधित महिलेला ताब्यात घेतलं असून तिने असं कृत्य का केलं? विमानात गोंधळ घालण्याचा प्रयत्न का केला? याची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
या प्रवासी महिलेने केलेल्या या कृत्यानंतर देखील विमानाचा मार्ग बदलण्यात आला नाही. विमानाने फ्लोरिडाच्या दिशेने प्रवास सुरूच ठेवला. मात्र, या घटनेबाबत जमिनीवरील संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यात आला होता. विमान थेट मियामीला पोहोचेपर्यंत अधिकारी विमानाची वाट पाहत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, विमान खाली उतरताच त्या महिलेला ताब्यात घेत पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. हे विमान स्थानिक वेळेनुसार रात्री ११:२३ च्या सुमारास मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल एनमधील गेट डी दोनवर पोहोचलं.
Woman strips naked in flight, performs 'explicit, indecent' acts in full view of other passengers pic.twitter.com/TobyQggmS6
— D. Scott @eclipsethis2003 (@eclipsethis2003) September 14, 2026
संबंधित महिलेने केलेल्या गोंधळानंतर विमानातील परिस्थिती हाताळण्यासाठी केबिन क्रूने नेमकं काय उपाययोजना केल्या? या घटनेमुळे विमानातील प्रवाशांवर याचा काय परिणाम झाला? याची माहिती अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, ही घटना ११ सप्टेंबर रोजी अमेरिकन एअरलाईन्सच्या AA1779 या विमानात घडली असल्याचं वृत्तात म्हटलं आहे. त्या महिलेची ओळख पटवण्याचं काम सुरू असून तिने असं वर्तन का केलं? याची चौकशी केली जात आहे.
