scorecardresearch

कुल्लू येथे पॅराग्लायडिंग करताना २६ वर्षीय तरुणीचा मृत्यू; पायलटची ‘ही’ चूक बेतली जीवावर

Himchal Pradesh Paragliding Accident Incident: २६ वर्षीय महिलेच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी पायलटला अटक केली आहे. पोलिसांनी अहवालात म्हटले आहे की, पॅराग्लायडिंगच्या वेळी पायलटने..

Women Dies During Paragliding In Himachal Pradesh Pilot Made These Huge Mistakes That Caused Her Life Precautions While Planning
पॅराग्लायडिंग करताना २६ वर्षीय तरुणीने गमावला जीव, चूक कोणाची? (फोटो: प्रातिनिधिक/ सिद्धी शिंदे)

Himachal Pradesh Women Dies During Paragliding: हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे रविवारी पॅराग्लायडिंग अपघातात हैदराबाद येथील महिला पर्यटकाचा मृत्यू झाला असे वृत्त पीटीआयने दिले आहे. २६ वर्षीय महिलेच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी पायलटला अटक केली आहे. पोलिसांनी अहवालात म्हटले आहे की, पॅराग्लायडिंगच्या वेळी पायलटने पर्यटक महिलेचा सेफ्टी बेल्ट नीट बांधला नव्हता ज्यामुळे पॅराग्लायडिंग सत्रादरम्यान उंचावरून पडून तिचा मृत्यू झाला. पर्यटन अधिकारी, सुनैना शर्मा यांनी या घटनेनंतर, नमूद केले की पायलट हा नोंदणीकृत होता आणि वापरलेल्या उपकरणांना मान्यता देण्यात आली होती, या दुर्दैवी घटनेत पायलटकडून झालेले दुर्लक्ष हे महिलेच्या मृत्यूचे कारण आहे.

पीटीआयशी बोलताना, कुल्लूच्या पर्यटन अधिकारी, सुनैना शर्मा असेही म्हणाल्या की, तपासात असे दिसून आले आहे की ‘मानवी चुकांमुळे’ दुर्दैवी अपघात झाला. साइट आणि उपकरणे मंजूर झालेली आहेत, पायलट नोंदणीकृत आहेत तसेच त्यावेळी हवामानाशी संबंधित कोणतीही समस्या नव्हती.

Shahrukh Khan Qatar PM
“मोदींनी नव्हे, कतारमधील भारतीयांना शाहरुखने सोडवलं”, भाजपा नेत्याचा दावा; किंग खानच्या कार्यालयाने केला खुलासा
Eknath Khadse Ashok Chavan
अशोक चव्हाणांच्या भाजपा प्रवेशानंतर एकनाथ खडसेंची फेसबूक पोस्ट व्हायरल; म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून मी…”
Mauris Noronha
अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर चार दिवसांनी मॉरिसच्या पत्नीचा गौप्यस्फोट! म्हणाली, “मॉरिस व्हिलन…”
Former Maharashtra CM Ashok Chavan Resigned from Congress in Marathi
“…म्हणून मी राजीनामा दिला”, अशोक चव्हाणांनी सांगितलं काँग्रेस सोडण्याचा निर्णय कधी आणि का घेतला?

दरम्यान, पीटीआयच्या वृत्तानुसार, कुल्लूच्या प्रादेशिक रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आणि अंतिम संस्कारांसाठी मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला आहे. कुल्लूचे जिल्हाधिकारी तोरूल एस रवीश यांनी या घटनेबाबत दंडाधिकारी चौकशीची मागणी केली आहे.या प्रकरणी पाटलीकुहल पोलिस ठाण्यात आयपीसीच्या कलम ३३६ आणि ३३४ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

हे ही वाचा<< शार्कचा समुद्रात डायव्हिंग करणाऱ्या ग्रुपवर हल्ला, भयंकर क्षण कॅमेऱ्यात कैद; एकाच झटक्यात दोघांना केलं लक्ष्य

दरम्यान, थंडीच्या महिन्यांमध्ये विशेषतः हिमाचल प्रदेशात पर्यटकांची तुफान गर्दी असते. मागील काही दिवसांपासून तर सतत स्नो फॉल होत असल्याने अनेकांनी हिमाचल गाठण्याचे प्लॅन केले आहेत. बीर-बिलिंग, कुल्लू सारख्या ठिकाणी पॅराग्लायडिंग करणे हा सुद्धा अनेकांच्या प्लॅनचा भाग असतो. पण या घटनेनंतर आता काही दिवस तरी पर्यटकांनी पॅराग्लायडिंगकडे पाठ फिरवण्याची शक्यता टाळता येत नाही. या दुर्घटनेनंतर, ही घटना घडलेल्या कुल्लूच्या डोभी गावात पॅराग्लायडिंगचे सर्व उपक्रम थांबवण्यात आले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Women dies during paragliding in himachal pradesh pilot made these huge mistakes that caused her life precautions while planning svs

First published on: 12-02-2024 at 18:30 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×