राजस्थानचं मेहंदीपूर बालाजी हे गाव खरं तर खाटू श्याम या धार्मिक स्थळासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, हे गाव आता वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आलं आहे. त्याचं कारण म्हणजे, येथील काही महिलांनी एका तरुणाबरोबर जबरदस्तीने शारिरीक संबंध बनवून त्याला ब्लॅकमेल करत आत्महत्या करण्याठी प्रवृत्त केल्याचं पुढे आलं आहे. तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या १२ पानांच्या सुसाईट नोटमधून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मी या महिलांच्या त्रासाला कंटाळलो असून मी यापुढे हा त्रास सहन करू शकत नाही, त्यामुळे मी आत्महत्या करतो आहे, असं त्याने या सुसाईट नोटमध्ये लिहिलं आहे.

हेही वाचा – ‘एमएसएमई’ संचालक प्रशांत पार्लेवारला अटक, बहिण अर्चना पुट्टेवारसोबत मिळून हत्याकांडाचा कट

navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
Farah Khan recalls Pooja Bedi skirt Pehla Nasha shoot
‘पहला नशा’ शूट करताना पूजा बेदीचा स्कर्ट हवेत उडाला अन् पंखा घेऊन खाली बसलेला स्पॉट बॉय…, फराह खानने सांगितला किस्सा
neet student marathi news
‘शिक्षणाच्या फॅक्टरी’तून पळून गेलेल्या एका मुलाची सगळ्यांचे डोळे उघडणारी गोष्ट
Chandrababu Naidu Swearing-in Ceremony Updates in Marathi / Chandrababu Naidu Takes Oath As Andhra Pradesh Chief Minister / Pawan Kalayan Cabinet Minister Oath
Andhra Pradesh CM Oath Ceremony : चंद्राबाबू नायडूंनी घेतली आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ; अभिनेते पवन कल्याण कॅबिनेट मंत्री
Elon Musk China Visit
‘स्पेसएक्स’च्या महिला कर्मचाऱ्यांशी लैंगिक संबंध, मुलं जन्माला घालण्यास दबाव; एलॉन मस्क यांच्यावर गंभीर आरोप
Uddhav Thackeray
विधान परिषदेच्या जागांवरून महाविकास आघाडीत बिघाडी? उद्धव ठाकरे म्हणाले, “काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी…”
Mark Rutte bicycle video
ना जाहिरातबाजी, ना सोहळा… ‘या’ देशाचे पंतप्रधान राजीनामा देऊन सायकलवर बसून घरी गेले, VIDEO व्हायरल

‘क्राईम तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वीच मेहंदीपूर बालाजी या गावात राहणाऱ्या अंतेश नावाच्या एका तरुणाला गावातील अनिता जांगिड नावाच्या एका महिलने जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडलं तसेच त्याचा व्हिडीओदेखील बनवला. त्यानंतर आरोपी महिलेने त्याला ब्लॅकमेल करत पैसे मागण्यास सुरुवात केली. इतकच नाही, तर तिने त्याला इतर महिलांबरोबर शारिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडलं. याचा व्हिडीओ बनवत इतर महिलांनीही त्याच्याकडे पैशांची मागणी सुरू केली.

मागच्या काही दिवसांपासून हा प्रकार सातत्याने सुरू होता. अखेर आरोपी महिलांच्या या त्रासाला कंटाळून पीडित तरुणाने आत्महत्येचा पर्याय स्वीकारला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार पीडित तरुणाने सोमवारी रात्री (१० जून रोजी ) गावातील एका लॉजवर जाऊन खोली बूक केली. या खोलीत पहाटे पाच वाजता त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

हेही वाचा – ३०० रुपयांचे दागिने ६ कोटींना विकले, देशातील ‘या’ मोठ्या बाजारात परदेशी महिलेची कशी केली फसवणूक?

दरम्यान, सकाळी लॉजचे कर्मचारी साफसफाई करण्याठी गेले त्यावेळी त्यांनी दरवाजा ठोठावला. मात्र, कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत. दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं पुढं आलं. यावेळी पोलिसांना मृतदेहाच्या शेजारीच १२ पानांची सुसाईट नोटदेखील मिळाली. या सुसाईट नोटमध्ये ४ महिलांसह एकूण १२ जणांची नावे होती. या सर्वांनी तरुणाला ब्लॅकमेल करत त्याच्याकडून पैसे ऐटल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच मी या महिलांच्या त्रासाला कंटाळलो असून मी यापुढे हा त्रास सहन करू शकत नाही, त्यामुळे मी आत्महत्या करतो आहे, असंही त्याने या सुसाईट नोटमध्ये लिहिलं होतं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिता जांगिड या महिलेने पीडित तरुणाकडे ५ लाख रुपयांची मागणी केली होती. तसेच इतर महिलांनीही त्याच्याकडे पैशांची मागणी केली. दरम्यान राजस्थान पोलिसांनी याप्रकरणी आरोपींविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.