Latvia Country Men Shortage: उत्तर युरोपमधील बाल्टिक देशांपैकी एक असेलल्या लातविया देशात विचित्र समस्या उद्भवली आहे. लातवियामध्ये लिंग गुणोत्तरात लक्षणीय असमतोल आहे. ज्यामुळे महिलांना घरकामात मदत व्हावी, यासाठी नवरे काही तासांसाठी भाड्याने घ्यावे लागत आहेत. द न्यू यॉर्कने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. युरोस्टॅटच्या आकडेवारीनुसार, लातवियामध्ये पुरूषांपेक्षा महिलांचे प्रमाण १५.५ टक्क्यांनी अधिक आहे. या संबंधीच्या काही डॉक्युमेंटरीही झाल्या आहेत. युट्यूबवर त्या पाहायला मिळतात. खाली एका व्हिडीओची माहिती दिली आहे.
द पोस्टने दिलेल्या बातमीनुसार, कामाच्या ठिकाणी आणि कुटुंबात पुरूषांची कमतरता जाणवत आहे. डानिया नावाच्या महिलेने या वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, तिचे सर्व सहकारी महिला आहेत. महिलांबरोबर काम करताना मला आवडत असले तरी लिंग संतुलन असल्यास समाजिक संवाद साधता येतो. डानियाची मैत्रीण झेन म्हणाली की, देशात पुरूषांची संख्या कमी असल्यामुळे अनेक महिला पुरूषांची साथ मिळावी म्हणून परदेशात प्रवास करतात.
घरामध्ये कुणीही पुरूष नसल्यामुळे घरातील कामे करण्यासाठी काही महिला पुरूष भाड्याने घेत आहेत. कोमांडा२४ सारखे प्लॅटफॉर्म ‘मेन विथ गोल्डन हँड्स’, हे सेवा पुरवतात. यातून प्लबिंग, सुतारकाम, दुरूस्ती आणि टीव्ही इन्स्टॉलेशन अशा कामांसाठी पुरूष मिळतात.
Remontdarbi या प्लॅटफॉर्मवरही अशीच सुविधा दिली जाते. येथे महिलांना ऑनलाइन किंवा फोन करून एका तासासाठी नवरा भाड्याने घेता येतो. घरातील छोटी-मोठी दुरूस्ती करणे, पेटिंग, पडदे लावून देणे अशा कामांसाठी या साईटवरील पुरूषांची मदत घेतली जाते.
तज्ज्ञांच्या मते, लातवियामध्ये पुरूषांचे कमी आयुर्मान हे लिंग असमतोलाचे मोठे कारण आहे. धूम्रपानाचे असलेले अधिक प्रमाण आणि जीवनशैलीशी संबंधित आरोग्यच्या समस्यांमुळे पुरूषांचे आयुर्मान याठिकाणी कमी आहे. वर्ल्ड ॲटलसच्या मते, लातवियामधील ३१ टक्के पुरूष धूम्रपान करतात. तर महिलांमध्ये हे प्रमाण केवळ १० टक्के आहे. तसेच अनेक पुरूषांना लठ्ठपणाची समस्या आहे.
लातविया देशाचे क्षेत्रफळ आणि लोकसंख्या
लातवियाचे एकूण क्षेत्रफळ ६४,५८९ चौरस किलोमीटर इतके आहे. येथील लोकसंख्या १८ ते १९ लाखांच्या घरात आहे. बाल्टिक समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या या देशात सपाट मैदान, पूर्वेकडे काही टेकड्या आणि उंच भाग आहेत. तसेच जंगलाचे प्रमाणही अधिक आहे. लातवियाची अधिकृत भाषा लातवियन आहे, तरीही रशियन लोकांची संख्या जास्त असल्यामुळे येथे रशियनही मोठ्या प्रमाणात बोलली जाते.

१९९१ मध्ये जुन्या सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यानंतर लातवियाने स्वातंत्र्य मिळवले. २००४ मध्ये लातवियाला युरोपियन युनियन आणि नाटोचे सदस्यत्व मिळाले.
