scorecardresearch

VIDEO : ‘हिंदू एकता मंच’च्या ‘बेटी बचाओ महापंचायत’ कार्यक्रमात महिलेची व्यक्तीला चपलेने मारहाण; नक्की काय आहे प्रकरण?

आज हिंदू एकता मंचने दिल्लीतील छतरपूर येथे ‘बेटी बचाओ महापंचायत’ आयोजित केली होती.

VIDEO : ‘हिंदू एकता मंच’च्या ‘बेटी बचाओ महापंचायत’ कार्यक्रमात महिलेची व्यक्तीला चपलेने मारहाण; नक्की काय आहे प्रकरण?
फोटो सौजन्य – एएनआय वृत्तसंस्था

श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर हिंदू संघटनांमध्ये प्रचंड रोष आहे. या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी विविध संघटनांकडून देशभरात आंदोलनं सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आज ‘हिंदू एकता मंच’नेही दिल्लीतील छतरपूर येथे ‘बेटी बचाओ महापंचायत’ आयोजित केली होती. मात्र, या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर भाषण देण्यासाठी चढलेल्या महिलने एका व्यक्तीला चपलेने मारल्याचा प्रकार घडला आहे.

हेही वाचा – Shraddha Walkar Murder: श्रद्धाची अंगठी, केसांचे बुचके अन् गुजरात कनेक्शन; आफताबसंदर्भात नवे धक्कादायक खुलासे

गेल्या पाच दिवसांपासून या महिलेची मुलगी बेपत्ता आहे. त्यामुळे आपली कैफियत मांडण्यासाठी ती महिला ‘बेटी बचाओ महापंचायत’ कार्यक्रमात सहभागी झाली होती. ती व्यासपीठावरून बोलत असताना शेजारी असलेल्या व्यक्तीने तिला बाजुला करण्याच्या प्रयत्न केला. मात्र, तिला बोलू न दिल्याच्या रागातून तिने त्याला मारहाण केल्याची माहिती आहे.

हेही वाचा – Shraddha Murder Case: आफताब पूनावालावर तलवारीने हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानंतर दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय

”माझी मुलगी बेपत्ता असून याप्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी मी पोलीस ठाण्याच्या चकरा मारते आहे. मात्र, पोलीस माझी तक्रार लिहून घेत नाहीत”, अशी प्रतिक्रिया तिने माध्यमांशी बोलताना दिली आहे. ”आज या लोकांनी ‘बेटी बचाओ महापंचायत’ आयोजित केली आहे. पण जेव्हा नेते मंडळीच मुलीवर डोळा ठेऊन असतील तर आमच्या मुलींना कोण आणि कसं वाचवणार?” असा प्रश्नही तिने उपस्थित केला आहे. दरम्यान, हा विषय महिलेचा घरघुती विषय असून पोलीस तिच्या मुलीचा शोध घेत आहेत, अशी प्रतिक्रिया आयोजकांनी दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 17:09 IST

संबंधित बातम्या