Iran Women Protest: पश्चिम इराणमधील महिलांनी हिजाब हटवून शनिवारी साघेझमध्ये सरकार विरोधात तीव्र आंदोलन केले. हिजाब संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांच्या मारहाणीत २२ वर्षीय महसा अमिनी यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ इराणमधील महिला आक्रमक झाल्या आहेत.

चीनकडून पुन्हा दहशतवाद्यांची पाठराखण, मुंबई हल्ल्याचा सुत्रधार साजिद मीरला काळ्या यादीत टाकण्यास दर्शवला विरोध

Guna Road Accident
कारच्या ब्रेकमध्ये बिअरची बॉटल अडकल्यामुळे भीषण अपघात; भाजपाच्या दोन नेत्यांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
alliance with the BJP the opposition of the farmers Dushyant Chautala
भाजपाशी युती तुटली तरीही शेतकऱ्यांचा विरोध कायम, दुष्यंत चौटाला यांच्या अडचणी थांबता थांबेना
aap protests on delhi road against arvind kejriwal s arrest
‘आप’ विरुद्ध भाजप; केजरीवाल यांच्या समर्थनार्थ ‘आप’ची निदर्शने, भाजपकडून राजीनाम्याची मागणी
Delhi aap
आप कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, भाजपाही केजरीवालांच्या राजीनाम्यावर ठाम; दिल्लीत सत्ताधारी-विरोधकांची निदर्शने!

हिजाब हटवून करण्यात आलेल्या या आंदोलनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. इराणमध्ये महिलांना हिजाब अनिवार्य आहे. हिजाब हटवणे हा इराणमध्ये दंडनीय गुन्हा आहे. महसा अमिनी या इराणची राजधानी तेहरानमधून कुर्दिस्थानमध्ये त्यांच्या कुटुंबासोबत नातेवाईकांना भेटण्यासाठी जात होत्या. त्यावेळी महिलांच्या हिजाब संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना पोलिसांनी अटक केली होती. अमिनी यांना पोलिसांच्या गाडीत मारहाण करण्यात आल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. हा आरोप पोलिसांनी फेटाळला आहे. याप्रकरणी इराण सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत.

पोलीस कोठडीत हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अमिनी यांच्यावर कासरा रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार करण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. पोलिसांचा हा दावा अमिनी कुटुंबीयांनी फेटाळला आहे. पोलिसांनी अटक करेपर्यंत महसा या निरोगी होत्या, असे कुटुंबीयांनी म्हटले आहे.

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी हिजाब आणि महिलांच्या ड्रेस कोडबाबतच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश काही आठवड्यांपूर्वी दिले होते. हिजाब संबंधित नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर शिक्षेला सामोरे जावे लागेल, असा इशाराही रईसी यांनी दिला होता. या आदेशानंतर ही घटना उघडकीस आली आहे.