scorecardresearch

धक्कादायक! गर्भवती महिलेने सावत्र मुलीला ठेवले पेटीत कोंडून, महिलेविरोधात गुन्हा दाखल

पोलिसांनी महिलेविरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

धक्कादायक! गर्भवती महिलेने सावत्र मुलीला ठेवले पेटीत कोंडून, महिलेविरोधात गुन्हा दाखल
संग्रहित छायाचित्र / लोकसत्ता

उत्तरप्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये महिलेने आपल्या ९ वर्षीय सावत्र मुलीला एका पेटीत कोंडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या महिलेविरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून ही महिला गर्भवती असल्याने तिला अद्याप अटक केली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शिल्पी असं या महिलेचे नाव आहे. तर राधिका असं नऊ वर्षीय मुलीचं नाव आहे.

हेही वाचा – Shraddha Murder Case: आफताब पूनावालावर तलवारीने हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानंतर दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय

राधिका ही कालपासून ( सोमवार २८ नोवेंबर) बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी महिलेच्या घरी जात तपासणी केली. तेव्हा पोलिसांना ती एका पेटीत बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. दरम्यान, ती शुद्धीवर आल्यानंतर तिच्या आईने तिला पेटीतून कोंडून ठेवल्याचे तिने पोलिसांना सांगितले.

हेही वाचा – Delhi Murder: रोज सापडत होते मृतदेहाचे तुकडे, पोलिसांनी तपासले तब्बल ५०० फ्रीज; असा झाला दिल्लीच्या पांडव नगरमधील खूनाचा उलगडा

राधिकाही मुजफ्फरनगर मध्ये राहणाऱ्या सोनू शर्मा यांच्या पत्नीची मुलगी असून घटस्पोट ती वडिलांकडे राहत होती. अशी माहिती ही पोलिसांनी दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 14:47 IST

संबंधित बातम्या