सावत्र मुलाने आईवर केला बलात्कार

घटनेच्यावेळी तिची दोन मुले शेजारच्या खोलीत झोपली होती.

(संग्रहित छायाचित्र)

सावत्र मुलानेच आईवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशच्या भोपाळमधील गोविंदपुरा भागात घडली. फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. पीडित महिला गोविंदपुरा भागामध्ये राहते. शुक्रवारी रात्री ती तिच्या रुममध्ये झोपलेली असताना आरोपी रात्री ११ च्या सुमारास तिथे आला व त्याने बलात्कार केला. याबद्दल कुठे वाच्यता केली, तर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी त्याने धमकी सुद्धा दिली. पीडित महिलेने तिच्या तक्रारीमध्ये हे म्हटले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

पीडित महिलेने मदतीसाठी आरडा-ओरडा करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपीने जबरदस्तीने तिचं तोंड बंद केलं. घटनेच्यावेळी तिची दोन मुले शेजारच्या खोलीत झोपली होती. बलात्कारानंतर आरोपीने पीडित महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली व तिथून पसार झाला. दुसऱ्या दिवशी हिम्मत एकवटून तिने, घडलेला प्रकार नातेवाईकांना सांगितला व त्यांच्याकडे मदत मागितली.

आणखी वाचा- मैत्रिणीला खुश करण्यासाठी मालकाचे ४४ लाख पळवून झाला होता फरार आणि…

समाजात बदनामी होईल, म्हणून नातेवाईकांनी तिला तक्रार दाखल करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. शनिवारी रात्री अखेर तिने तक्रार नोंदवण्याचा निर्णय घेतला व गोविंदपुर पोलीस ठाणे गाठले. आरोपीचे वडिल आणि पीडित महिलेच्या पतीचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Women raped by her stepson in bhopal dmp

ताज्या बातम्या