जागतिक महिला दिवस कधी असतो याचं उत्तर आपल्यापैकी अनेकांना माहित असेल की दरवर्षी ८ मार्च ला आपण हा दिवस साजरा करतो. पण जागतिक पुरुष दिन कधी असतो या प्रश्नाचं उत्तर देताना विचार करावा लागेल किंवा माहितही नसेल. जागतिक पुरुष दिन १९ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो.

त्यामुळे जागतिक महिला दिवसाच्या निमित्ताने भाजपाच्या राज्यसभेतील खासदार सोनल मानसिंग यांनी जागतिक पुरूष दिन साजरा करण्यात यावा असे सांगितले. आज राज्यसभेत बोलताना त्या म्हणाल्या की, जागतिक पुरूष दिनही साजरा करावा असं मी आपणा सर्वांना आवाहन करते.

आंतरराष्ट्रीय महिला दिनी महिला आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना अभिवादन करताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या की कोरोनाविषाणु विरूद्धच्या भारताच्या लढाईत त्यांच्या अस्पष्ट योगदानाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

“Her शिवाय Hero नाही! कोविड -१९ चा प्रसार झालेल्या संकटाच्या काळात # नारीशक्तीची नि: स्वार्थ आणि दृढ भूमिकासमोर आली. या महिला दिनाच्या दिवशी आम्ही कोरोनाविरूद्धच्या भारताच्या लढाईत महत्वाची भूमिका बजावलेल्या ६ दशलक्षपेक्षा अधिक महिला आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निर्विवाद योगदानाला अभिवादन करतो. . @ डब्ल्यूएचओ, ” असे महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी आपल्या ट्वीट संदेशात म्हणाल्या.