२ ऑक्टोबर हा गांधी जयंतीचा मुहूर्त साधून लेहमध्ये जगातल्या सर्वात मोठ्या खादीच्या राष्ट्रीय ध्वजाचं अनावरण करण्यात आलं आहे. महात्मा गांधीजींच्या १५२व्या जयंतीनिमित्ताने हा तिरंगा तिथे लावण्यात आला असून त्याचं उद्घाटन लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर आर. के. माथूर यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. यावेळी भारताचे लष्करप्रमुख मनोज नरवणे देखील उपस्थित होते. भारतीय लष्कराच्या ५७ इंजिनिअर रेजिमेंटने हा सर्वात मोठा खादीचा ध्वज तयार केला असून तो लेहमध्ये समुद्रसपाटीपासून २००० फूट उंचीवर ठेवण्यात आला आहे.

…म्हणून ठरला जगातला सर्वात मोठा खादीचा ध्वज

लेहमध्ये २००० फूट उंचावर ठेवण्यात आलेल्या या ध्वजाची लांबी तब्बल २२५ फूट आहे. तर ध्वजाची रुंदी १५० फूट इतकी आहे. हा ध्वज पूर्णपणे खादीचा असून त्याचं वजन तब्बल १ हजार किलो इतकं आहे! ५७ इंजिनिअर रेजिमेंटच्या १५० जवानांनी मिळून हा ध्वज २००० फूट उंचीच्या टेकडीवर नेला.

mumbai high court on sawantwadi dodamarg wildlife corridor
विश्लेषण : सावंतवाडी-दोडामार्ग कॉरिडॉर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील? न्यायालयाचा आदेश काय? होणार काय?  
श्श्श्श… वाघोंबांची तलावामध्ये सुरू आहे पूल पार्टी; ‘ठंडा ठंडा कुल कुल’मुळे बाहेर निघायलाच तयार नाही
taiwan earthquake reason
Taiwan Earthquake: २५ वर्षांतील सर्वात मोठ्या भूकंपाने हादरला देश, तैवानमध्ये वारंवार भूकंप का होतात?
idli rajma among top 25 dishes most damaging biodiversity reseach
आलू पराठ्यापेक्षा इडली जास्त हानिकारक, चणा मसाला, राजमा खाण्यापूर्वी ‘हा’ धक्कादायक अहवाल वाचाच

दरम्यान, यावेळी प्रतिक्रिया देताना लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर आर. के. माथूर म्हणाले, “गांधीजी म्हणाले होते की आपला राष्ट्रध्वज म्हणजे एकता आणि मानवतेचं प्रतीक आहे. या देशातल्या प्रत्येकानं या प्रतीकाचा स्वीकार केला आहे. हे आपल्या देशाच्या महानतेचं प्रतीक आहे. यापुढील वर्षांमध्ये लेहमधला हा ध्वज आपल्या जवानांसाठी उत्साहाचं देखील एक प्रतीक असेल”.

देशाचे आरोग्यमंत्री मनसूख मांडविय यांनी या ध्वजाचा व्हिडीओ ट्वीट करून त्यावर आपला संदेश लिहिला आहे. “भारतासाठी हा प्रचंड अभिमानाचा क्षण आहे, कारण गांधीजींच्या जयंतीच्या दिवशीच जगातील सर्वात मोठ्या खादीच्या तिरंग्याचं अनावरण लेह-लडाखमध्ये झालं आहे. देशाचा सन्मान करणाऱ्या या कृतीला मी सलाम करतो”, असं ट्वीट मनसुख मांडवीय यांनी केलं आहे.