जगभरातील सर्वाधिक ११२ वर्षे वयाचे वृद्ध सॅल्युस्टियानो सांचेझ-ब्लाझकेझ यांचे नुकतेच निधन झाले. ११६ वर्षांचे सर्वाधिक वयाचे वृद्ध जिरोमोन किमुरा यांचे जूनमध्ये निधन झाल्यानंतर गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्सने सॅल्युस्टियानो ऊर्फ शॉर्टी यांना सर्वाधिक वयाचे वृद्ध म्हणून जाहीर केले होते. न्यूयॉर्कच्या ग्रॅण्ड आयलण्ड येथील नर्सिग होममध्ये वृद्धापकाळाने सॅल्युस्टियानो यांचे शुक्रवारी निधन झाले.  संगीतकार आणि कोळसा खाण उद्योगात काम करणारे ‘शॉर्टी’ यांचा जन्म ८ जून १९०१ रोजी स्पेनमधील एका गावात झाला होता.