Writer salman rushdie on ventilator after life threatening attack in new york america | Loksatta

जीवघेण्या हल्ल्यानंतर सलमान रश्दी व्हेंटिलेटरवर, एक डोळा गमवावा लागण्याची शक्यता

वादग्रस्त लिखाणाप्रकरणी रश्दी यांना अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या

जीवघेण्या हल्ल्यानंतर सलमान रश्दी व्हेंटिलेटरवर, एक डोळा गमवावा लागण्याची शक्यता
सलमान रश्दी

पश्चिम न्यूयॉर्कमध्ये एका कार्यक्रमादरम्यान झालेल्या जीवघेण्या हल्ल्यातून बचावल्यानंतर प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. शस्त्रक्रियेनंतर त्यांना एक डोळा गमवावा लागू शकतो, असे वृत्त ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने दिले आहे. भारतीय वंशाचे ब्रिटिश-अमेरिकन लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्कमधील चौटौका इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित व्याख्यानादरम्यान एका व्यक्तीने चाकूने हल्ला केला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रश्दींवर सध्या उपचार सुरू आहेत.

सलमान रश्दी यांच्या ‘द सॅटॅनिक व्हर्सेस’ या पुस्तकातील काही मुद्द्यांवरून इराणकडून रश्दी यांना जीवे ठार मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. या पुस्तकाला १९८८ पासून इराणमध्ये बंदी आहे. या पुस्तकात ईश्वरनिंदा केल्याचे मुस्लीमधर्मीय मानतात. इराणचे दिवंगत नेते अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांनी रश्दी यांच्या मृत्यूबद्दल बक्षीस देण्याचा फतवा जारी केला होता. रश्दींची हत्या करणाऱ्या व्यक्तीला ३ दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

RSS DP : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डीपीमधून भगवा झेंडा गायब; मोहन भागवतांनीही बदलला आपला डीपी

दरम्यान, वादग्रस्त लिखाणाप्रकरणी रश्दी यांना अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रश्दी पश्चिम न्यूयॉर्कमध्ये व्याख्यानासाठी व्यासपीठावर पोहोचताच एका व्यक्तीने त्यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. रश्दी यांनी विरोध करताच या व्यक्तीने त्यांना चाकूने भोसकले. हल्ल्यानंतर रश्दी यांना एअर अॅम्ब्युलन्सने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घटनेनंतर तात्काळ या हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली होती.

खोटय़ा आश्वासन संस्कृतीतून मुक्तता कधी?; काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना सवाल

सलमान रश्दी हे भारतीय वंशाचे ब्रिटिश कादंबरीकार आणि लेखक आहेत. त्यांच्या ‘मिडनाईट्स चिल्ड्रेन’ या कादंबरीला १९८१ मध्ये ‘बुकर’ पुरस्कार मिळाला होता. रश्दी यांचे लिखाण अनेकदा वादात सापडले आहे. ‘द सॅटॅनिक व्हर्सेस’ ही त्यांची कादंबरी सध्या वादाच्या केंद्रस्थानी आहे. या कादंबरीला अनेक मुस्लीम देशांनी विरोध दर्शवला आहे. याविरोधात काही देशांमध्ये हिंसक आंदोलने देखील करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर रश्दी यांना वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. यामुळे तब्बल एक दशक रश्दी भूमीगत होते.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
RSS DP : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डीपीमधून भगवा झेंडा गायब; मोहन भागवतांनीही बदलला डीपी

संबंधित बातम्या

Hijab Ban: इराणमधल्या महिलांच्या हिजाब सक्तीविरोधातील संघर्षाला यश; ‘संस्कृतीरक्षक पोलिसां’चा गाशा गुंडाळला
“जाहिरातीत सांगितल्यापेक्षा गाडी कमी मायलेज देते”, ग्राहकाची कोर्टात याचिका, निकाल देताना कोर्टानं संगितलं…!
“फ्रिजमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे होते पण…”, आफताबच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडने सांगितले धक्कादायक अनुभव
दुख:द! साईंच्या चरणी नमस्कार करण्यासाठी वाकला अन् हृदयविकाराचा झटका आला; तरुणाचा मृत्यू
धक्कादायक! दिल्लीमध्ये लिव्ह इन पार्टनरचा खून, ४ दिवसांपासून फरार असलेल्या आरोपीला पंजाबमध्ये अटक

व्हिडिओ

ताज्या बातम्या
‘बिग बॉस’ मराठीच्या घरातून डॉ. रोहित शिंदे बाहेर; इतर स्पर्धक झाले भावुक
पुणे: अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या सासू-सुनेला अटक; २० किलो गांजा जप्त
‘बिग बॉस’ मराठीच्या घरातून ‘हे’ वाईल्ड कार्ड स्पर्धक बाहेर; नेमकं कारण काय?
‘छत्रपती शिवाजी महाराजांबाबतची चुकीची विधाने खपवून घेतली जाणार नाहीत’; खासदार श्रीकांत शिंदे यांचा इशारा
FIFA WC 2022: किलर किलियन! फ्रान्सची नवव्यांदा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक, पोलंडची झुंज अपयशी