Video: “लोकांनी कमी स्वयंपाक करावा म्हणून केंद्राने सिलेंडरचे भाव वाढवले”

“कोथिंबीर काय आणि कांदे काय? डिझेल काय आणि पेट्रोल काय? सगळं काही महाग झालं आहे. अच्छे दिन आणणारे लोकं महागाईचे दिन आणतायत.”

Fuel Prices Hike
मोदी सरकावर वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर केली टीका (प्रातिनिधिक फोटो)

देशात पेट्रोल-डिझेल सोबतच सिलेंडर, डाळी, भाज्यांचे भाव देखील कडाडले आहेत. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या महागाईवरून महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. ‘अच्छे दिन’ आणणाऱ्या लोकांनीच ‘महागाईचे दिन’ आणले, असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

“महागाई वाढवणारं सरकार केंद्रात सत्तेत आहे. मग कोथिंबीर काय आणि कांदे काय? डिझेल काय आणि पेट्रोल काय? सगळं काही महाग झालं आहे. अच्छे दिन आणणारे लोकं महागाईचे दिन आणतायत. यावर मी काय बोलू?,” असं म्हणत ठाकूर यांनी उपरोधिक पद्धतीने महागाईवर टीका केलीय.

“सिलेंडरचे भाव यासाठी वाढलेत कारण लोकांनी कमीत कमी स्वयंपाक करावा. तेलाचे भाव यासाठी वाढले आहेत कारण लोकांचं आरोग्य व्यवस्थित रहावं. डिझेल पेट्रोलचे भाव यासाठी वाढलेत की करोना काळात लोकांनी बाहेर पडू नये. अशी स्पष्टीकरणं केंद्र देणार असेल तर यांना वेगळ्या पद्धतीने उत्तर द्यावं लागेल,” असं ठाकूर यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Yashomati thakur slams bjp government for inflation and fuel price hike scsg

फोटो गॅलरी