विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाची देशभरात चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम करताना दिसत आहे. तर दुसरीकडे या चित्रपटावरुन राजकारणही चांगलेच तापले आहे. काश्मीरमधील पंडितांवर १९९० साली झालेल्या अत्याचारांसंदर्भातील कथानकावर हा चित्रपट आधारित आहे. अनेक दिग्गज कलाकारांसह पंतप्रधान मोदी आणि राजकारण्यांनी या चित्रपटावर आपली प्रतिक्रिया दिली. दरम्यान, आता तृणमूलचे उपाध्यक्ष आणि माजी भाजपा नेते यशवंत सिन्हा यांनी या चित्रपटावरून केंद्र सरकारला खोचक टोला लगावला आहे.

The Kashmir Files मध्ये मराठमोळ्या चिन्मय मांडलेकरने साकारलेला दहशतवादी बिट्टा कराटे नेमका कोण आहे?

MP Sanjay Singh says it is time to say goodbye to BJP
खासदार संजयसिंग म्हणतात, ‘भाजपला निरोप देण्याची वेळ’
Kashmiri voters form m (1)
काश्मिरी पंडितांना आता ‘फॉर्म एम’शिवाय करता येणार मतदान; आजवर का होती याची आवश्यकता?
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
After the EPS-95 pensioners the Halba community also upset with BJP
इपीएस-९५ पेन्शनधारकानंतर ‘हलबा’ बांधवही सत्ताधाऱ्यांवर नाराज; म्हणाले, “भाजपला…”

ट्वीट करत सिन्हा म्हणाले की, “काश्मीर फाइल्स हा चित्रपट संपूर्ण भारतात करमुक्त (टॅक्स फ्री) करणं पुरेसं नाही. हा चित्रपट सर्व भारतीयांसाठी पाहणं अनिवार्य करणारा कायदा संसदेत संमत करायला हवा. जे हा चित्रपट पाहणार नाही, त्यांना दोन वर्षे तुरुंगात पाठवायला हवं आणि जे चित्रपटावर टीका करतील त्यांना आयुष्यभर तुरुंगात टाका,” असा खोचक टोला सिन्हा यांनी लगावला आहे.

देशभरातील अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आलाय. शिवाय आसाममध्ये तर सरकारी कर्मचाऱ्यांना तर चित्रपट पाहण्यासाठी अर्ध्या दिवसाची पगारी रजा देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. या सर्व प्रकारावरून यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

“काश्मीरमध्ये मारल्या गेलेल्या त्या १५०० हिंदूंसाठी कोण अश्रू ढाळणार?” The Kashmir Files वरुन ओवेसींचा मोदी सरकारला सवाल

विवेक अग्निहोत्री यांचं दिग्दर्शन असलेल्या ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटानं सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटगृहात इतरही बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होऊनही या चित्रपटाचाच बॉक्स ऑफिसवर बोलबाला असलेला पाहायला मिळत आहे. पहिल्याच दिवशी ७०० स्क्रीनवर प्रदर्शित झालेला हा चित्रपट नंतर वाढवून २००० स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात आला. पाच दिवसांत या चित्रपटानं मोठा गल्ला जमवला आहे. पाचव्या दिवसाअखेर या चित्रपटानं एकूण ६० कोटी रुपयांची कमाई केली होती.