काश्मीर फुटीरतावादी नेता यासिन मलिकला राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने दहशतवादी फंडिंग प्रकरणात दोषी ठरवले आहे. मागच्या सुनावणीत यासीन मलिकने दहशतवादासाठी फडिंग केल्याचे आरोप स्वीकारले होते, त्यानंतर न्यायालयाने मलिकला दोषी ठरवले आहे. एनआयने याबाबत ट्वीट केले आहे. मलिकवर गुन्हेगारी कट रचणे, देशाविरुद्ध युद्ध पुकारणे, इतर बेकायदेशीर कारवाया आणि काश्मीरमधील शांतता भंग केल्याचा आरोप होता.

यासिन मलिकला पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत त्याच्या आर्थिक मालमत्तेबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. १० मे रोजी मलिकने दिल्ली न्यायालयासमोर आपले आरोप कबूल केले होते.

या काश्मीर फुटीरवादी नेत्यांवरही आरोप

10 मे रोजी झालेल्या मागील सुनावणीत न्यायालयाने फारुख अहमद दार उर्फ ​​बिट्टा कराटे, शाबीर शाह, मसरत आलम, मोहम्मद युसूफ शाह, आफताब अहमद शाह, अल्ताफ अहमद शाह, नईम खान, मोहम्मद अकबर खांडे, राजा मेहराजुद्दीन कलवाल, बशीर अहमद यांना अटक केली होती. जहूर अहमद शाह वताली, शब्बीर अहमद शाह, अब्दुल रशीद शेख आणि नवलकिशोर कपूर यांच्यासह इतर काश्मिरी फुटीरतावादी नेत्यांवर औपचारिकपणे आरोप निश्चित करण्यात आले.