scorecardresearch

यदियुरप्पा यांच्या नातीची आत्महत्या

कामावर आलेल्या मोलकरणीने बराच वेळ दरवाजा ठोठावूनही तो उघडण्यात आला नाही.

(प्रतिनिधिक छायाचित्र)

बंगळुरू : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. यदियुरप्पा यांची नात डॉ. सौंदर्या व्ही. वाय. यांचा मृतदेह शुक्रवारी वसंत नगरमधील सौंदर्या यांच्या सदनिकेत गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० वर्षीय सौंदर्या या एका खासगी रुग्णालयात सेवेत होत्या. त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले असावे, हे अद्याप तरी स्पष्ट झालेले नाही.  यदियुरप्पा यांच्या द्वितीय कन्या पद्मावती यांची सौदर्या ही कन्या होय. सौंदर्या यांचा विवाह डॉ. नीरज एस. यांच्याशी २०१८ मध्ये झाला होता. ते दोघेही एकाच रुग्णालयाच्या सेवेत होते. शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास डॉ. नीरज हे कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडले. त्यानंतर दोन तासांत सौंदर्या यांनी आत्महत्या केली असावी.

 असे पोलिसांचे म्हणणे आहे. कामावर आलेल्या मोलकरणीने बराच वेळ दरवाजा ठोठावूनही तो उघडण्यात आला नाही. तिने डॉ. नीरज यांना ही माहिती त्यांनी. त्यांनीही घरी फोन केला असता प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर बाहेरून बळाचा वापर करून दरवाजा उघडण्यात आला. सौंदर्या यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी बोर्वंरग रुग्णालयात झाली.

ही घटना समजताच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह काही ज्येष्ठ मंत्री आणि भाजप नेत्यांनी यदियुरप्पा यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Yeddyurappa grandson commits suicide akp

ताज्या बातम्या