Yoga Guru Sharath Jois Passes Away : प्रसिद्ध योग गुरू शरथ जोइस यांचं ५३ व्या वर्षी १२ नोव्हेंबर रोजी अमेरिकेतील व्हर्जिनिया येथे निधन झालं आहे. शरथ जोइस हे ट्रेकिंग करत असताना ह्रदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती सांगितली जात आहे. शरथ जोइस यांना अष्टांग योगाचे प्रणेते म्हणून ओळखलं जातं. शरथ जोइस यांनी आपलं संपूर्ण जीवन योगाचा प्रसार करण्यासाठी समर्पित केलं. मात्र, त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हर्जिनिया येथील शार्लोट्सविले येथील विद्यापीठाजवळ ट्रेकिंग दरम्यान शरथ जोइस यांना ह्रदयविकाराचा धक्का आला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, १६ ते २० नोव्हेंबर या कालावधीत सॅन अँटोनियो, टेक्सास या ठिकाणी आणि पुढील वर्षी सिडनी व दुबई येथे त्यांनी आपल्या काही आंतरराष्ट्रीय कार्यशाळा आयोजित केल्या होत्या.

हेही वाचा : Madras High Court: “जोडप्याने एकमेकांचे चुंबन घेणे स्वाभाविक,” उच्च न्यायालयाने रद्द केला लैंगिक अत्याचाराचा खटला

दरम्यान, योग गुरू शरथ जोइस यांनी सर्वात प्रभावशाली योगगुरूंपैकी एक मानले जातात. ते ही कला त्यांचे आजोबा दिवंगत पट्टाभी जोइस यांच्याकडून शिकले होते. अष्टांग योगाला मुख्य प्रवाहात आणि लोकप्रियतेत आणण्याचं श्रेयही शरथ जोइस यांना जातं. २००९ मध्ये शरथ जोईस यांनी विद्यार्थ्यांना योग शिकवण्यासाठी योग केंद्राची स्थापना केली होती. ते योग शिकवत असत. ते मॅडोनासारख्या सेलिब्रिटींना योग शिकवत होते. यासंदर्भातील वृत्त फ्री प्रेस जर्नलने दिलं आहे.

Story img Loader