नोएडा : किमान वेतनात वाढ मिळावी या मागणीसाठी कामगारांनी सोमवारी नोएडामध्ये केलेल्या निदर्शनांनंतर उत्तर प्रदेश सरकारने मंगळवारी वेतनवाढ केली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ही वेतनवाढ १ एप्रिलपासून लागू होणार आहे.
गौतम बुद्धनगरच्या जिल्हा न्यायदंडाधिकारी मेधा रूपम यांनी सांगितले की, राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी रात्री या निर्णयाला मंजुरी दिली. त्यानुसार, गौतम बुद्धनगर आणि गाझियाबाद जिल्ह्यांमध्ये आता अकुशल कामगारांना दरमहा १३ हजार ६९० तर अर्धकुशल कामगारांना प्रतिमहा १५ हजार ५९ आणि कुशल कामगारांना १६ हजार ८६८ रुपये वेतन दिले जाईल. इतर महापालिका क्षेत्रे आणि जिल्ह्यांमधील कामगारांनाही वेतनवाढ मंजूर करण्यात आली आहे.
