विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली. अगदी थाटामाटात ऐतिहासिक शपथविधी पार पाडल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची कमान आपल्या हाती घेतली आहे. दरम्यान, यावेळी योगींच्या मंत्रिमंडळामध्ये काही नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला असून आधीच्या सरकारमधील तब्बल २६ मंत्र्यांना डच्चू देण्यात आलाय.

योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री असतील. केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांच्याकडे उपमुख्यंत्रिपद देण्यात आलंय. तर वगळण्यात आलेल्यांमध्ये माजी उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा तसेच सतीश महाना, सिद्धार्थनाथ सिंह, जय प्रताप सिंह, नीलकंठ तिवारी, जय प्रकाश निषाद आणि जय कुमार सिंह आदी नेत्यांचा समावेश आहे. त्यांच्या जागेवर आता नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

former MLA Ulhas Pawar
अफवा पसरविण्यात रा. स्व. संघ वस्ताद; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’
janardhan reddy return to bjp
खाण घोटाळाप्रकरणी नऊ गुन्हे दाखल असलेल्या माजी मंत्र्याचा भाजपात प्रवेश; यामागचं राजकारण काय?
violation of code of conduct in thane
सत्ताधाऱ्यांकडूनच आचारसंहितेला हरताळ? ठाण्यात फलकबाजीला जोर, प्रशासन ढिम्म 

योगी २.० मंत्रिमंडळामध्ये अनेक दिग्गज नेत्यांना वगळण्यात आले आहे. तर दुसरीकडे दिवंगत नेते लालजी टंडन यांचे पुत्र आशुतोष टंडन सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून येऊनही त्यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात आलेला नाही.

योगींच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री

सूर्य प्रताप शाही, सुरेश कुमार खन्ना, स्वतंत्र देव सिंह, बेबी रानी मौर्य, लक्ष्मी नारायण चौधरी, जयवीर सिंह, धर्मपाल सिंह, नंद गोपाल गुप्ता नंदी, भूपेंद्र सिंह चौधरी, अनिल राजभर, जितिन प्रसाद, राकेश सचान, अरविंद कुमार शर्मा, योगेंद्र उपाध्याय, आशिष पटेल, संजय निषाद.

योगींच्या मंत्रिमंडळातील राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार)

नितीन अग्रवाल, कपिलदेव अग्रवाल, रविंद्र जायसवाल, संदीप सिंह, गुलाब देवी, गिरीश चंद्र यादव, धर्मवीर प्रजापती, असीम अरुण, जेपीएस राठोड, दयाशंकर सिंह, नरेंद्र कश्यप, दिनेश प्रताप सिंह, अरुण कुमार सक्सेना, दयाशंकर मिश्र दयालु.

योगींच्या मंत्रिमंडळातील राज्यमंत्री

मयंकेश्वर सिंह, दिनेश खटीक, संजीव गौड, बलदेव सिंह ओलख, अजित पाल, जसवंत, सैनी, रामकेश निषाद, मनोहर लाल मन्नू कोरी, संजय गंगवार, बृजेश सिंह, केपी मलिक, सुरेश राही, सोमेंद्र तोमर, अनुप प्रधान, प्रतिभा शुक्ला, राकेश राठोड, रजनी तिवारी, सतीश शर्मा, दानिश आझाद अन्सारी, विजय लक्ष्मी गौतम.

ऐतिहासिक शपथ आणि आजपर्यंतचा राजकीय प्रवास

विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवत सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची ऐतिहासिक किमया योगी आदित्यनाथ यांनी करून दाखवली आहे. ३५ वर्षांनंतर उत्तर प्रदेशच्या राजकारणात या इतिहासाची पुनरावृत्ती घडली आहे. महत्त्वाचं म्हणजे सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणारे योगी आदित्यनाथ भाजपचे उत्तर प्रदेशातील पहिलेच नेते आहेत.