पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी लखनऊ विमानतळावर दाखल झाले. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे स्वागत केले. मात्र, मोदींच्या या भेटीपेक्षा योगींनी केलेल्या ट्विटची चर्चा सगळीकडे सुरू आहे. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी योगी आदित्यनाथ यांनी एक ट्विट केले आहे. त्यांच्या या ट्विटनंतर विविध चर्चेला उधाण आले आहे.

योगींचे ट्विट

Unemployed youth works for political parties
Election 2024: राजकीय पक्षांसाठी काम करणारे पगारी कार्यकर्ते
onion, Dindori, loksabha election 2024,
दिंडोरीत कांदा प्रचाराच्या केंद्रस्थानी
utkarsha rupwate, Shirdi, vanchit,
नाराज उत्कर्षा रुपवते यांचा काँग्रेसचा राजीनामा, वंचितमध्ये प्रवेश; शिर्डीतून लढणार
Narayan Rane, Vinayak Raut,
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ‘कडवट’ माजी-आजी शिवसैनिकांमध्ये लढत

‘शेषअवतार भगवान श्री लक्ष्मण यांच्या लखनऊ या पवित्र नगरीमध्ये तुमचे हार्दिक स्वागत आणि अभिवादन’,असे ट्विट योगींनी केले आहे. याोगींच्या या ट्विटमुळे लखनऊ शहराचे नाव बदलले जाणार का? अशी चर्चा सध्या सुरू आहे.

लखनऊचे नाव लक्ष्मपुरी असल्याचा दावा

योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात फैजाबाद जिल्ह्याचे नाव बदलून ‘अयोध्या’ आणि अलाहाबादचे ‘प्रयागराज’ करण्याच्या दोन प्रलंबित मागण्या पूर्ण केल्या होत्या. आता त्यांचे पुढचे ध्येय लखनऊचे नामांतर असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असे म्हणतात, की लखनऊचे नाव पूर्वी लक्ष्मणपुरी होते आणि नंतर ते बदलले गेले. लखनऊचे नाव बदलून ‘लक्ष्मणपुरी’ करण्याची मागणी भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी वेळोवेळी केली आहे.

लक्ष्मणाचा १५१ फूट उंच पुतळा बसवण्याची योजना
लखनऊच्या महापौर संयुक्त भाटिया यांनी लखनऊ महानगरपालिकेद्वारे गोमती नदीजवळ लक्ष्मणचा १५१ फूट उंच पुतळा बसवण्याची योजना आखली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राजस्थानचे विद्यमान राज्यपाल योगी आदित्यनाथ यांच्या पहिल्या कार्यकाळात कलराज मिश्रा यांनी लखनऊचे नाव बदलून लक्ष्मणपुरी करण्याची मागणी केली होती. हे सगळ्यांच्या मते झाले तर लोकांना जुन्या काळातील संस्कृतीशी जोडण्यास मदत होईल, असे ते म्हणाले होते.

अयोध्येचे प्रवेशद्वार म्हणून लखनऊची नवी ओळख

लखनऊच्या महापौर संयुक्त भाटिया यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, महानगरपालिकेने गोमतीजवळील जागेसाठी सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. प्रशासन केवळ लक्ष्मणाचा भव्य पुतळा बसवणार नाही तर रामाचे शहर अयोध्येचे प्रवेशद्वार म्हणून लक्ष्मणपुरी (लखनऊ) ची ओळख निर्माण करणार आहे. महापालिकेने पुतळ्यासाठी १५ कोटी रुपये आधीच राखून ठेवले असून, भव्यतेसाठी आणखी निधी उभारला जात आहे. तसेच लक्ष्मणावर आधारीत संग्रहालयाची निर्मितीही करणार असल्याचे भाटिया यांनी सांगितले.

भाजपावर सपा नेत्यांची टीका
मात्र, सपा नेते राजेंद्र चौधरी यांनी भाजपाच्या या अजेंड्यावर टीका केली आहे. भाजपा लखनऊला लक्ष्मणाची भूमी संबोधत आहेत यात आश्चर्य नाही. मात्र, गरीब, वंचित आणि बेरोजगार यांच्या भविष्यासाठी कोणतीही योजना भाजपाच्या अजेंड्यात नसल्याचे चौधरी यांनी म्हणले आहे.