scorecardresearch

मी कोणाचा गुलाम नाही, मी टोपी घालणार, दाढी ठेवणार, माझी मुलगी हिजाब घालणार – असदुद्दीन ओवैसी

आपला फक्त भारतीय संविधानावर विश्वास आहे आणि त्या अंतर्गत राहून आपल्या शब्दावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले.

मी कोणाचा गुलाम नाही, मी टोपी घालणार, दाढी ठेवणार, माझी मुलगी हिजाब घालणार – असदुद्दीन ओवैसी

हिजाबबाबत सुरू असलेल्या वादात अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला दिसत नाही. दोन्ही बाजू आपापल्या मतावर ठाम आहेत. दरम्यान, एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी हिजाबवरील कोणत्याही बंदीला विरोध करणार असल्याचे म्हटले आहे. आपण कोणाचा गुलाम नाही, टोपी आणि दाढी ठेवणार आणि आपली मुलगी हिजाब घालणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला जात आहे. त्यात असदुद्दीन ओवेसी इशारा देत आहेत की, “तुम्हाला माझी दाढी आवडत नसेल तर काळजी करू नका, मी दाढी ठेवेन, तुम्हाला माझ्या डोक्यावरची टोपी आवडली नाही तर मी टोपी घालेन, तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला हिजाब घातलेला आवडत नाही, माझी मुलगी हिजाब घालेल. मी तुमचा गुलाम आहे, मी तुमचा ऋणी आहे का? मी जगात राहिलो तर भारतीय राज्यघटनेनुसार माझी प्रतिष्ठा राखून जगेन”.

ते केव्हा आणि कुठे बोलत आहेत याचा उल्लेख व्हिडीओमध्ये नाही, परंतु रविवार, २० फेब्रुवारी रोजी त्यांच्या सार्वजनिक सभा सवैजपूर, लखीमपूर खेरी, खलीलाबाद आणि संदिला येथे होत्या. हा व्हिडीओ त्या बैठकीचा आहे की वेगळा बनवला आहे, हे त्यात स्पष्ट झालेले नाही. हिजाब ते दाढी आणि टोपीवर आपली भूमिका स्पष्ट करताना ओवैसी यांनी कोणाचीही गुलामी सहन करणार नसल्याचे सांगितले. आपला फक्त भारतीय संविधानावर विश्वास आहे आणि त्या अंतर्गत राहून आपल्या शब्दावर ठाम असल्याचे सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: You do not like my cap i will wear it i will keep a beard my daughter will wear a hijab said asaduddin owaisi vsk

ताज्या बातम्या