पीटीआय, अमरावती
तिरुपती येथील लाडू भेसळीच्या मुद्द्यावरून वायएसआर काँग्रेसचे प्रमुख वायएस जगन मोहन रेड्डी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र देत या प्रकरणात हस्तक्षेपाची मागणी केली आहे. तसेच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू खोटे पसरवण्यात निष्णांत असल्याचा आरोप करत त्यांना फटकारण्याची मागणीही रेड्डी यांनी मोदींकडे केली आहे. नायडू केवळ राजकीय हेतूंसाठी कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेला ठेच पोहोचवत असल्याचा आरोपही रेड्डी यांनी केला आहे.

तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराच्या संरक्षक प्रक्रियेची माहिती देतानाच रेड्डी यांनी आठ पानी पत्रात नायडू यांच्या कृतीमुळे केवळ मुख्यमंत्र्यांचाच नव्हे तर सार्वजनिक जीवनात ‘टीटीडी’ची पवित्रता आणि त्यांच्या पद्धती आदी सर्वांचा दर्जाही खालावल्याचा आरोप केला. ‘सर, या क्षणाला संपूर्ण देश तुमच्याकडे पाहतो आहे. नायडू यांना कठोर पद्धतीने फटकारणे आणि सत्य समोर आणणे अत्यंत आवश्यक आहे. हे पाऊल नायडू यांनी कोट्यवधी हिंदू भाविकांच्या मनात निर्माण केलेल्या शंका दूर करण्यात आणि ‘टीटीडी’च्या पवित्रतेवर त्यांचा विश्वास पुनर्संचयित करण्यात मदत करेल,’ असे रेड्डी यांनी पत्रात नमूद केले आहे.

sada sarvankar marathi news (1)
“उद्धव ठाकरेंसारखा माणूस राजकारणात सापडणार नाही”, सदा सरवणकरांच्या नावाने पोस्ट व्हायरल; स्वत: स्पष्टीकरण देत म्हणाले…
sai godbole brand ambassador of the apple company
मराठी अभिनेत्रीची लेक झाली ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर!…
terror of gangster Mangalwar Peth , Mangalwar Peth,
पुणे : तडीपार गुंडाची कोयते उगारून दहशत, मंगळवार पेठेतील घटना
raj thackeray sada sarvankar Amit Thackeray
“सरवणकरांना उमेदवारी मागे घेण्याची विनंती कधीच केली नाही”, मनसेचा चिमटा; म्हणाले, “त्यांचे दोन्ही पाय…”
sada sarvankar marathi news
अमित ठाकरेंचा मार्ग मोकळा? सदा सरवणकरांचे माघारीचे संकेत? म्हणाले, “कार्यकर्त्यांशी बोलून पुढचा निर्णय…”
Rishi Kapoor would have killed himself
…तर ऋषी कपूर यांनी आत्महत्या केली असती, नीतू कपूर यांनी लेक रिद्धिमाबद्दल बोलताना केलेलं वक्तव्य
nagpur district thackeray shiv sena chief devendra godbole resigned from his post
ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा राजीनामा
Sanjay Bhoir and Meenakshi Shinde have withdrawn their rebellion after cm s orders
बंडोबा थंडावताच संजय केळकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, भेटीत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याचा केळकरांचा दावा