04 August 2020

News Flash

Happy Diwali 2017 : ‘हे’ हटके दागिने वाढवतील तुमचे सौंदर्य

बोहेमियन आणि गोंड्यांच्या ज्वेलरीबाबत खास टिप्स

दिवाळी म्हटले की नटणे-मुरडणे आणि मिरवणे आलेच. महिलांसाठी हा सण म्हणजे खरेदी आणि तयार होऊन आनंद लुटण्याचाच. आता तयार व्हायचे म्हटल्यावर त्यामध्ये कपड्यांबरोबर दागिनेही आले. दरवर्षी बाजारात निरनिराळे ट्रेंड येत असताना आपणही या ट्रेंडनुसार असावे असे बहुतांश महिलांना वाटते. मग त्यासाठी त्यातही आपण हटके आणि तरीही उठून कसे दिसू शकू यासाठी त्यांचा प्रयत्न सुरु असतो. नाजूकसाजूक किंवा नेहमीच तेच तेच दागिने वापरण्याला पर्याय म्हणजे बोहेमियन ज्वेलरी. बोहेमियन पद्धतीचे मॉडर्न दागिने नक्कीच आउट ऑफ द बॉक्स ठरतील. ते वापरण्याच्या काही टिप्स.

केवळ लहान रिंग्स आणि कानातल्यांपासून ऑक्सिडाइज दागिने उपलब्ध होते परंतु आता मोठय़ा नेकपीसेस, आर्म बॅण्ड, अँकलेट्स, ब्रेसलेट्स पर्यंत बोहेमिअन पद्धतीची ज्वेलरी उपलब्ध असते.

* कॉलर असलेलं ब्लाउज किंवा कुर्ता घाला, त्या कॉलरच्या भोवती मस्त मोठा नेकपीस घाला. त्याला पेअर करण्यासाठी लहानसे कानातले आणि जाड ब्रेसलेट्स घाला. हा लुक खूपच मस्त दिसेल.

* सलवार कमीज किंवा साडी असेल तर त्यावर गळेबंद कलरफुल नेकपीस घाला. नेकपीस जाडसर असेल तर कानातले घालण्याची गरज नाही. त्यामुळे संपूर्ण लक्ष तुमच्या कपडय़ांवर आणि नेकपीसवर राहील.

* हेवी बोहेमिअन पद्धतीचे कानातले घालणार असाल तर नेकपीस घालणे टाळा.

* खूप लहान अंगठय़ा, ब्रेसलेट्स किंवा अँकलेट्स तुम्ही रोजच्यासाठीही वापरू शकता.

सध्या वेगवेगळ्या ब्राइट रंगाचे गोंडे ज्वेलरीमध्ये वापरले जातात. थोडय़ा मोठय़ा आकाराच्या गोंडय़ांचे इअरिंग्स, त्याचबरोबर ब्रेसलेट्स, नेकपीसेस, गोंडेदार चप्पल सध्या ट्रेण्डमध्ये आहेत. कुर्तीज, साडी किंवा अनारकली, लेहेंगा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रॅडिशनल आऊटफिट्सवर ही ज्वेलरी खूप उठून दिसते. कोणत्याही सणावाराला ही ज्वेलरी अतिशय सुटेबल आहे. ज्वेलरी बरोबरीनेच गोंडे जडवलेल्या कुर्तीज, ओढण्या, स्कार्फ असे आऊटफिट्ससुद्धा खूप इन ट्रेण्ड आहेत.

गोंडेदार ज्वेलरी वापरताना..

* एखाद्या गडद रंगाच्या आऊटफिटबरोबर जर गोंडेदार नेकपीस वापरणार असाल तर गोंडय़ांचा रंग पेस्टल किंवा लाइट निवडा. गळ्यालगत किंवा लांब अशा कोणत्या प्रकारचा नेकपीस वापरावा हे आऊटफिटनुसार ठरवा. खूपच ट्रेण्डी आणि फेस्टिव्ह लुक मिळेल. इअरिंग्स नेकपीसबरोबर घालणार असाल तर त्याचा आकार लहान असू द्यावा.

* एका वेळी गोंडेदार इअरिंग्स किंवा नेकपीस यातलं एकच अ‍ॅक्सेसरीज आऊटफिटवर वापरा.

* एखाद्या आऊटफिटवर इअरिंग्स घालणार असाल तर मॅचिंगऐवजी गोंडय़ांचा रंग कॉन्ट्रास्ट असू द्या. खूप उठावदार आणि क्लासी लुक मिळेल. त्यांचा लहान मोठा आकार कपडय़ानुसार ठरवा.

* हँडवर्क केलेली गोंडेदार ओढणी वापरणार असाल तर प्लेन कुर्ती घाला. जेणेकरून ती ओढणी उठून दिसेल.

* गोंडेदार चप्पल्स कोणत्याही आऊटफिटवर उठून दिसेल. बॉटम शक्यतो अँकल लेन्थ असू द्या. त्यावर गोंडेदार चप्पल्स जास्त उठून दिसतील. घरच्या घरीसुद्धा तुमच्या चपलांना तुम्ही गोंडय़ांनी सजवू शकता.

प्राची परांजपे

सौजन्य – लोकप्रभा

response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2017 11:30 am

Web Title: diwali festival ethnic ornaments fashion celebration jewelry
Next Stories
1 स्टाईलही आणि मनोहारीही, दिवाळीत आवर्जून करण्यासारखे ‘फॅशन ट्रेंड’
2 Happy Diwali 2017 : जाणून घेऊया धनत्रयोदशीचे महत्त्व…
3 Diwali 2017 : दिवाळीसाठी सिंगापूर सज्ज
Just Now!
X