साहित्य
संत्र्याच्या फोडी – बारा-पंधरा
संत्रा ज्यूस – १/२ कप
अंडी – दोन नग
बटर – १/४ कप
मैदा – दीड कप
साखर – ३/४ कप
बेकिंग पावडर – अर्धा चमचा
सुकलेल्या क्रेनबेरी – अर्धा कप
मीठ – अर्धा चमचा

कृती
१) ओव्हन ३७५ सें. टि. डि.ला प्रिहीट करावे.
२) मिक्सरमध्ये संत्र्यांच्या फोडी (सोललेल्या) संत्र्यांचा ज्यूस, अंडी व बटर एकत्र करून घ्यावे.
३) एका बोलमध्ये साखर, बेकिंग पावडर, मीठ व मैदा एकत्र करावे. मिश्रण चांगले एकत्र करावे. मिश्रणाच्या मध्यभागी सुकलेल्या क्रेनबेरी, संत्र्याचे मिश्रण घालून मिश्रण चांगले ढवळून घ्यावे. दाटसर पीठ तयार होते.
४) मफिन्सच्या मोल्डला ग्रीस करावे व त्यात तयार मिश्रण ओतावे. मफिन मोल्ड पाऊण (३/४) भरावा.
५) ओव्हनमध्ये मफिन्स २० ते २५ मिनिटांकरिता बेक करावेत.
६) तयार मफिन्स थंड करून खायला द्यावे.