साहित्य :
टोफूचे मिश्रण
किसलेला टोफू – एक कप
किसलेला गाजर – १/४ कप
उकडलेली स्वीटकॉर्न – १/४ कप
लाल तिखट – दोन चमचे
हळद – १/४ चमचे
कोथिंबीर
मीठ – चवीनुसार
मिश्रण
बेसण – ३/४ कप
पाणी – गरजेनुसार
हळद – १/४ चमचे
मीठ – चवीनुसार
ब्राऊन ब्रेड – ७ नग
तेल – तळण्याकरिता
कृती
१) उकडलेले स्वीटकॉर्न मॅश करून घ्यावेत. टोफूचे मिश्रण तयार करून घ्यावे. मिश्रण चार भागांत करून ठेवून द्यावे.
२) एका प्लेटवर ब्राऊन ब्रेड ठेवावा, त्यावर तयार मिश्रण एकसारखे पसरवून घ्यावे.
३) दुसरा ब्रेडचा स्लाइस त्यावर ठेवावा व अलगद दाबावा व दोन भागांमध्ये डायजेनली कापून घ्यावे.
४) अशाच प्रकारे उरलेले स्लाइसदेखील तयार करावेत.
५) पीठ तयार करून घ्यावे.
६) तेल गरम करायला ठेवावे. प्रत्येक तयार स्लाइसचे तुकडे पिठामध्ये सर्व बाजूंनी घोळवून घ्यावेत व गरम तेलात कुरकुरीत होइस्तोवर तळून घ्यावेत.
७) तयार पकोडे टिशू पेपरवर काढून घ्यावेत व टोमॅटो केचपबरोबर सव्र्ह करावेत किंवा मेयॉनिज व टोमॅटो केचपचे डिप बनवावे. त्यात तिखट हवे असल्यास त्यात चिली फ्लेक्स घालता येईल.
नीलेश लिमये
(सौजन्य : लोकप्रभा)
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 20, 2017 11:17 am