प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी खरेदीकडे नागरिकांचा कल

प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी सर्वच स्तरांतून विविध चर्चा होत असताना उरण परिसरात दिवाळीनिमित्त मातीच्या दिव्यांसोबतच मातीचे कंदीलही विक्रीसाठी आले आहेत. राजस्थान आणि गुजरातमधून आलेल्या या कंदिलांना सध्या मोठी मागणी असून प्लॅस्टिकमुक्त दिवाळी साजरी करण्याकडे नागरिकांचाही कल यातून दिसून येत आहे.

nashik, Adulterated Goods, Worth Rs 54 thousand, Adulterated Goods Seized, Adulterated prasad, Trimbakeshwar Adulterated prasad, nashik news,
त्र्यंबकेश्वरमध्ये ५४ हजार रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त
Badlapur, electricity power down, citizens, water supply
बदलापुरात वीज, पाण्यावाचून नागरिकांचे हाल; मध्यरात्री वीज गायब, दिवसाही घामांच्या धारात
series of tremors Navi Mumbai
शहरात हादऱ्यांची मालिका सुरूच, नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या बदलीनंतर नगररचना विभागही सुस्त
Pune, Youth Cheated, Rs 57 Lakh, Stock Market Investment Scam, NDA Employee, cyber fraud, Victims, lure, police, marathi news,
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने ‘एनडीए’तील कर्मचाऱ्याची ५७ लाखांची फसवणूक

उरणमध्ये विविध प्रकारच्या पणत्या तसेच दिवाळीसाठी शोभेच्या वस्तूंची विक्री सुरू आहे. यातील प्रमुख आकर्षण म्हणून मातीचे कंदीलदेखील आता बाजारांमध्ये उपलब्ध आहेत. १३० ते १५० रुपयांना कंदिलांची विक्री होत असून त्याचे वेगळेपण उरणकरांसाठी आकर्षणाचा विषय ठरत आहे. शिवाय या कंदिलांबरोबरच आकर्षक पणत्या व मातीच्या समईसुद्धा विक्रीसाठी असून त्यांची किंमत २० रुपयांपासून ६० रुपये डझन तर ४०, ६० व ८० रुपयांमध्ये या पणत्यांसाठीच्या खोपेदेखील विक्रीसाठी आलेले आहेत. या खोप्यांमध्ये पणती ठेवल्यानंतर त्याच्या छिद्रातून पडणारा मंद प्रकाश व त्याची प्रतिकृती आकर्षक ठरत आहे.