साहित्य
भाजलेला खवा – २५० ग्रॅम
मँगो पल्प – १ कप
साखर – १३/४ कप
पाणी
तूप

कृती
१) तूप सुटेस्तोवर खवा भाजून घ्यावा.
२) नॉनस्टिक भांडय़ात साखर व पाणी घालून, साखर विरघळवून घ्यावी.
३) त्यात मँगो पल्प घालून गोळी बंद पाक करावा. मिश्रण मंद आचेवर शिजवावे. थंड करावे.
४) खवा मिक्सरमधून बारीक करावा. त्यात मँगो पल्पचे मिश्रण घालावे.
५) ट्रेला तूप लावून घ्यावे.
६) मिश्रण तयार झाल्यावर ट्रेमध्ये एकसारखे पसरवून घ्यावे व सर्व बाजूंनी थापून घ्यावे.
७) वड्या पाडून घ्याव्यात.

– नीलेश लिमये

सौजन्य -लोकप्रभा