पारीसाठी :
गव्हाची कणीक रवा
सायीसकटचे दही
पाणी, मीठ, तेल,
हळद, ओवा
भाजलेली बडीशेप पावडर.
सारणासाठी :
कुस्करलेले पनीर
उकडलेल्या कच्च्या केळ्याचा व
बटाटय़ाचा लगदा
तिखट, मीठ, पिठीसाखर
सब्जी मसाला लिंबू रस
काजू तुकडे, बेदाणे.
तीळ, लसूण, दही, तेल, मिरपूड
ग्रेव्हीसाठी :
पांढरे कांदे काजू नारळचव खसखस.

कृती : 
परातीमध्ये कणीक घ्यावी. पारीसाठी दिलेले साहित्य घालून पीठ भिजवावे व पंधरा मिनिटे झाकून ठेवावे. सारणासाठी दिलेले साहित्य घेऊन सारण तयार करावे. मोदकासाठी करतो तशी कणकेची पारी करावी. त्यात सारण भरावे व बॉल तयार करावेत. कढईत तेल घ्यावे व मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत हे बॉल तळावेत. प्लेटमध्ये टिश्यू पेपरवर घालून त्यात ठेवावेत.

काजूचे तुकडे बारीक करावेत व पाण्यात भिजवावे. पॅनमध्ये तेल घालावे. त्यात बारीक चिरलेले पांढरे कांदे, काजू, पाणी घालून वाफ आणावी. पांढरे तीळ, खसखस, नारळ चव हलकेसे कोरडे भाजावे. हे सर्व व लसूण पाकळ्या घालून मिक्सरवर पेस्ट करावी. पॅनमध्ये तूप घालावे, ही पेस्ट घालावी, मिरपूड व मीठ घालावे. व तूप सुटेपर्यंत परतावे. शेवटी फेटलेले दही घालावे, व्यवस्थित ढवळावे व गॅस बंद करावा. या व्हाइट ग्रेव्हीमध्ये वरील बॉल सोडावेत. गरम सव्‍‌र्ह करावे.

टीप : ही ग्रेव्ही आधी करून ठेवता येते व चार दिवस तरी टिकते. व्हाइट ग्रेव्हीमध्ये सोनेरी बॉल आकर्षक दिसतातच शिवाय रुचकर व पौष्टिकही आहेत.