Happy Diwali 2017 : टोमॅटो शेव

दिवाळीतील खास पदार्थ

साहित्य :

टोमॅटो प्युरी – अर्धा कप
बेसन – दोन कप
बटर – दोन चमचे
मीठ – चवीनुसार
खायचा सोडा – चिमूटभर
हिंग – पाव चमचा
तेल – तळण्याकरिता आवश्यक तितके
पाणी

कृती :

१) एका भांडय़ात बेसन, टोमॅटो प्युरी, मीठ, हिंग, बटर व खायचा सोडा हे एकजीव करून घ्यावे. तिखट आवडत असेल तर मिश्रणात लाल तिखट घालता येईल. त्यात गरजेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्यावे. शेव सोऱ्यातून सहज कढईत पडेल व तळता येईल अशा पद्धतीने पीठ मळून घ्यावे.

२) चकलीच्या सोऱ्याला आतून तेल लावल्यास शेव पाडण्यास सोपे जाते. सोऱ्यात पिठाचा गोळा निमुळता करून घालावा व वरून झाकणाचा दाब देऊन सोऱ्या बंद करावा.

३) कढईत तेल गरम करून, सोऱ्यातून शेवेचे मिश्रण गोलाकार पद्धतीने टाकावे. शेव मोठय़ा आचेवर तळावी.

४) शेव तळून झाली की टिशू पेपरवर काढावी व थंड झाली की डब्यात भरावी.

नीलेश लिमये

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Diwali festival celebration with food recipes in marathi tomato shev

ताज्या बातम्या