नात्यात सूर जुळायला हवेत…

मला असं प्रामाणिकपणे वाटतं की, आता एकूणच सहजीवनाची, प्रेमाची व्याख्या बदलत चालली आहे. काळ झपाटय़ाने बदलतो आहे. घटस्फोटांचे प्रमाण ५० टक्क्य़ांवर पोहोचले आहे. नव्या पिढीतील लोक सहज ‘लिव्ह-इन्’मध्ये राहू लागलेत. व्यक्तिश: मला ‘लिव्ह-इन्’मध्ये काहीही गर वाटत नाही.

मला असं प्रामाणिकपणे वाटतं की, आता एकूणच सहजीवनाची, प्रेमाची व्याख्या बदलत चालली आहे. काळ झपाटय़ाने बदलतो आहे. घटस्फोटांचे प्रमाण ५० टक्क्य़ांवर पोहोचले आहे. नव्या पिढीतील लोक सहज ‘लिव्ह-इन्’मध्ये राहू लागलेत. व्यक्तिश: मला ‘लिव्ह-इन्’मध्ये काहीही गर वाटत नाही.
दहा वर्षांपूर्वी ‘लिव्ह-इन् रिलेशनशिप’ला अजिबात सामाजिक मान्यता नव्हती. आता अशा पद्धतीने राहणाऱ्यांना न्यायालयानेदेखील संमती दिलेली आहे. अर्थात कधी कधी असंही वाटतं, की ‘लिव्ह-इन्’चा अर्थ फक्त शारीरिक सुखासाठी असलेले नाते! पण हे नाते स्पिरिच्युअल- आध्यात्मिकही असू शकते!
लग्नाची आपल्याकडे असलेली व्याख्या मला फारच संकुचित वाटते. गुजरात राज्यात ‘मैत्री करार’ केला जातो. अनेकजण या नात्यात राहतात. यात सहजीवन एका विशिष्ट काळासाठी असते. शिवाय मी तर म्हणेन- ‘लिव्ह-इन्’मध्ये लग्नाचा खर्च नाही का वाचत?
असो. मी वर म्हटल्याप्रमाणे ‘लिव्ह-इन्’वर माझा विश्वास आहे. माझी पूर्वीची पत्नी तारा सुब्रमण्यम् हिच्याशी माझे काही तात्त्विक मतभेद झाले आणि आम्ही विभक्त झालो. विभक्त म्हणजे अगदी कायद्याने वेगळे झालो. पण तारा कित्येक वष्रे माझ्या आई-वडिलांचे सगळे आíथक व्यवहार सांभाळत होती.. अगदी वडील हयात असेपर्यंत. पण आई आजदेखील तारावर भावनिकदृष्टय़ा विसंबून आहे. तारा आणि मी घटस्फोटित असलो तरीही आमच्यात कसलेही ताणतणाव नाहीत. घटस्फोटामुळे सारी नाती, संबंध तुटत नाहीत. तारामध्ये खूपच परिपक्वता आहे. पण तरीही आमचं जुळलं नाही, हे खरं. तारानंतर मॉडेल व अभिनेत्री असलेल्या अनन्या दत्ता हिच्याशी माझे सूर जुळले. अर्थात मी कधी अनन्या आणि ताराची तुलना केली नाही. कारण ती तशी कधी होऊच शकत नाही.
अनन्या माझ्या आयुष्यात येण्याचे कारण माझी कंपनी! माझ्या जाहिरात कंपनीखेरीज माझे स्वत:चे एक प्रॉडक्शन हाऊस होते. या काळात माझ्या कंपनीचे काम अनन्या सांभाळत असे. माझा नाटकवेडा मित्र अश्विन गिडवानी आणि मी मिळून काही इंग्लिश नाटकांची निर्मिती केली. माझ्या बहुतेक नाटकांमध्ये अनन्या महत्त्वाच्या भूमिकांमध्ये होती.. ‘ओह, नो.. नॉट अगेन’, ‘फनी िथग्ज’, ‘कॅरी ऑन हेवन’, ‘गॉट टू बी ऐश्वर्या’ अशी खूप नाटकं आम्ही एकत्र केली. त्या एकत्रपणाच्या सहवासातून आमच्यात जवळीक निर्माण झाली. आम्ही खूपशा इव्हेंट्सना एकत्र जात असू. अनन्या खूप महत्त्वाकांक्षी आहे. अर्थात आमची जवळ-जवळ चार-पाच वर्षांची जवळीक, नित्याचा सहवास होता. सतत होणारे नाटकांचे दौरे, आमच्या कंपनीचं कामकाज यातून माझे अनन्याचे सूर जुळले खरे. पण पुढे दररोजच्या सहवासानंतर लक्षात आलं की, कायमस्वरूपी एकत्र राहणं आम्हाला शक्य नाहीए. नंतरच्या काळात मी वडाळ्याला राहत होतो. तिचं-माझं येणं-जाणं होत होतं, पण तरीही मी आणि अनन्या हळूहळू दुरावतच गेलो. आमच्यात घडलेल्या प्रसंगांची उजळणी येथे करणे योग्य ठरणार नाही. जेव्हा आम्ही एकत्र होतो तेव्हाही हे नाते पुढे न्यावं असं काही नव्हतं. या नात्याला ‘सोयीचं नातं’ किंवा ‘टाइम बीइंग’ नाते म्हणूयात. पण नातं लग्नातलं असो वा ‘लिव्ह-इन्’मधलं, ते टिकण्यासाठी काही बंध निर्माण होणे गरजेचे असतात. आमच्यात ते जुळले नाहीत आणि एकदा का ते जमत नाहीत, हे लक्षात आलं की वेगळं होणं हेच श्रेयस्कर.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व दिवाळी अंक २०१२ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Live in relationship story of bharat dabholkar

ताज्या बातम्या