News Flash

ती जुनी दिवळी नव्या दमाने आली…

अखेर ती जुनी दिवाळी नव्या दमाने दाखल झाली. जुन्या जगाच्या गालावर नवी झळाळी आली.. कानठळ्या बसविणाऱ्या गडगडाटी फटाकेबाजीमुळे दाटलेल्या धूरभरल्या धुक्यातून पहाट फटफटू लागली.

कालनिर्णय

महाराष्ट्राने गेल्या वर्षभरात अनेक थोर व्यक्ती गमावल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते अगदी कालनिर्णयकार जयंत साळगांवकर यांच्यापर्यंत.. यंदाच्या कालनिर्णय दिवाळी अंकाची सुरुवातच

दिवाळी पहाट कार्यक्रमाने रोहेकर मंत्रमुग्ध

ऐन ऑक्टोबर हीटमध्येही रोहेकरांना वसंत ऋतूतला बहर अनुभवायला मिळाला. निमित्त होते ते रसिकहो संस्थेतर्फे आयोजित दिवाळी पहाटचे

स्वागत दिवाळी अंकांचे

भटकंती हा तर अनेकांचा आवडता छंद. नेमके हेच हेरुन मस्त भटकंती या दिवाळी अंकाची निर्मिती करण्यात आली आहे. देश-विदेशातील अनेक सुंदर व प्रेक्षणिय स्थळांबद्दल यामध्ये माहिती लेख

आठवणीतील दिवाळी: ऐन दिवाळीत डेंग्यू!

'हसवाफसवी' नाटकाचे प्रयोग यशस्वीपणे सुरू असल्याने माझ्यासाठी यंदाची दिवाळी आधीपासूनच सुरू झालीये. १५ वर्षांपूर्वी आलेले, दिलीप प्रभावळकर यांच्या सहा भूमिका असलेले

हे सारे कोठून येते?

हा प्रश्न विजय तेंडुलकरांनी विचारला त्याला आता बरीच र्वष झाली. पण त्याचं उत्तर काही मिळालेलं नाही. मिळणारही नाही कदाचित. उलट, त्याच्या जोडीला आणखीही उपप्रश्न येऊन पडलेत. का आणि कसे,

गुलजार अक्षरचित्रे!

गुलजार! बहुआयामी प्रतिभेचा धनी.‘मुसाफिर हूं यारों..’ असं आपल्याच मस्तीत गुणगुणत त्यांनी बरीच मुशाफिरी केलीय. साठोत्तरी भारतीय साहित्यातलं ते एक झळाळतं पर्व आहेत. सिनेसृष्टीतलं त्यांचं स्थान तर अनन्यसाधारणच.

साहिर आणि जादू

साहिरचं मयत घेऊन गेले त्याच्या अगोदरची ही गोष्ट. मी जादूची गोष्ट सांगतोय आणि उल्लेख आहे साहिर लुधियानवी यांचा. जादू आणि साहिर यांचं नातं न्यारं आहे. जादू म्हणजे जावेद अख्म्तरचं प्रेमाचं

फुटपाथवरून…

दगडूला तोच कुत्रा पुन्हा चावला. तिसऱ्यांदा. शेंडीला आवडणारा असा कुठला सुवास आपल्या शरीराला आहे ते दगडूला कळेना. शेंडी हे कुत्र्याचं नाव. बेहराम म्हणाला, ‘‘सुवास नाही रे, त्याला घाण वास येतो

झड

पाऊस असा लागला होता मुंबईला; अन् तसंच दामूचं पिणंसुद्धा. पाच दिवस झाले. दिवस-रात्र सतत पीत होता दामू. आणि पाच दिवस झाले- आकाशसुद्धा बरसत होतं. दोघांना चढलीये असं वाटत होतं.

सारथी

एलिफंटाला जाणारी पहिली बोट सकाळी साडेसातला गेटवे ऑफ इंडियावरून सुटायची. म्हणून मारुतीला सकाळी साडेसहा वाजता पोचावं लागायचं. आधी केर काढायचा. प्रवाशांनी केलेला कचरा काढायचा. मग अख्खी बोट धुवायची. फडकं

वास

पार्टीवाला म्हणाला, ‘‘नऊ र्वष भांडून-झगडून आम्ही तुमच्या लोकांसाठी ही कॉलनी बनविली. तुम्हा लोकांना झोपडपट्टीतनं काढलं, सिमेंटची पक्की घरं करून दिली. आणि तुम्ही म्हणताय- डब्यात बंद केलं म्हणून.’’ माझा घरवाला सदोदित

वार्षिक राशिभविष्य : १४ नोव्हेंबर २०१२ ते ३ नोव्हेंबर २०१३

मेष : स्वप्ने साकारतील सतत कामात राहणे तुम्हाला आवडते. आपला महत्त्वाकांक्षी स्वभाव आपणास स्वस्थ बसू देत नाही. आपली साहसी, धाडसी वृत्ती आपणास यश मिळवून देत असते. नूतन वर्षी असेच काही

औदुंबराच्या सावलीत

‘ग्रेस’ नावाचं गारूड रसिकांवर अक्षय आहेच; पण हेच ग्रेस आपल्या निकटतम सुहृदांना कसे दिसले, कुठल्या रूपात आढळले, हे जाणून घेणंही निश्चितच औत्सुक्याचं ठरावं.

कोणास झेपेना त्याची चंद्रधून चांदण्यात ऊन.. पोळणारे।।

माझी आणि ग्रेस यांची भेट झाली त्यावेळी त्यांची दोन ते तीन छोटेखानी पुस्तकं प्रकाशित झाली होती. ‘संध्याकाळच्या कविता’ म्हणजे ‘देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी..’ या कवितासंग्रहाने दु:खाच्या अभिव्यक्तीचे

नवीन घरात…

आपल्या ललित लेखनातून लंपनचे निरागस, अद्भुतरम्य आणि अनोखे भावविश्व निर्माण करणारे लेखक प्रकाश नारायण संत यांच्यासोबतच्या सहजीवनाचे उत्कट चित्रण करणारे ‘अमलताश’ हे पुस्तक त्यांच्या पत्नी डॉ. सुप्रिया दीक्षित यांनी

‘मौजे’चे दिवस

श्रीनिवास विनायक कुलकर्णी.. लहानपणापासून ज्यांच्या ललित लेखनाचं गारुड आपल्यावर झालंय, त्या या लेखकाला भेटायचंय म्हटल्यावर काहीसं मोहरून जायला झालं होतं. परंतु दुसरीकडे त्यांच्या लेखनातून आपल्या मनात निर्माण झालेली त्यांची

परमनप्रवेश

एखाद्याचं आत्मकथन लिहायचं म्हणजे त्याच्या अंतरंगात डुबी मारणं आलंच! ते जितक्या उत्कटतेनं होईल, तितकं ते लेखन अस्सल उतरणार. अनेक गाजलेली आत्मकथनं शब्दबद्ध करणाऱ्या सिद्धहस्त लेखिकेचं रसीलं अनुभवकथन..

गवसणारं क्षितीज आणि हरवलेलं अंगण

आयटीच्या झंझावाताने देशातील नोकरी-व्यवसायाचा सारा माहोल बदलला. युवावर्गाची स्वप्नं बदलली. जीवनमान बदललं. खाण्यापासून नात्यांपर्यंत बऱ्याच गोष्टींत बदल झाला. काही हातात येतंय, असं वाटत असतानाच मंदीचे मळभ दाटले आणि

आय. टी. युगाची गोष्ट…

चेक-इन करून नेमलेल्या गेटवर जाऊन बसलो. रात्रीचा १ वाजला होता. ४.३० ची ब्राझिलची फ्लाइट होती. आजकाल तर अर्धी बॅग कायम भरून तयार असते. पण रात्रीचं जेवण होईपर्यंत उरलेल्या बॅगेला

एआरसीडी अर्थात अमेरिका रिटन्र्ड कन्फ्युज्ड देसी!

परत भारतात येणे हा निर्णय माझ्या बाबतीत म्हणायचं तर तसा अंगावरच आला. स्पिट्र टेलिकॉममधला प्रोजेक्ट संपला होता. माझ्या व्हिसाची मुदतही संपत आली होती. माझी कंपनी ग्रीन कार्ड करायला तयार

वेगळ्या वाटेचे वाटसरू

आयटी क्षेत्रातील बहुतांशी मंडळी ‘मी- माझं ऑफिस- माझं घर’ असं एकेरी आयुष्य जगत असतात. आय. टी.मधील स्वत:ची नोकरी सोडल्यास याच्या पलीकडे काही जग आहे, याची बहुतेकजणांना पुसटशी कल्पनादेखील

आहे मनोहर, तरी!

आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या युवावर्गाला नोकरीतील सुरक्षितता, मंदी, राहणीमान या साऱ्याबद्दल नेमकं काय वाटतं, हे जाणून घेण्याचा केलेला प्रयत्न- ‘२००८-०९ ची आर्थिक मंदी भयानक होती. सकाळी ऑफिसला गेलेला माणूस संध्याकाळी

एखादी पणती, मिणमिणती…

दुर्गम ग्रामीण भागातील मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करून, त्यांच्यातून सामाजिक बांधिलकी मानणारे जबाबदार प्रशासकीय अधिकारी घडविण्याचे मोलाचे काम काही संस्था नेटाने करीत आहेत. या उपक्रमांना ग्रामीण भागात उत्तम प्रतिसाद

Just Now!
X