पावसाळा म्हटल्यावर ओले कपडे हा सर्वात मोठा प्रश्न असतो. जून, जुलैमध्ये तर सुर्यदेवता अगदी कधीतरीच दर्शन देत असल्याने वेळात कपडे सुकतीलच याची काही शाश्वती नसते. घरात कपडे वाळत घालावेत तर त्यामुळे दमट हवा निर्माण होते. सध्या करोनामुळे तर अगदी छोट्यामोठ्या कामांसाठी घराबाहेर जाऊन आल्यानंतर कपडे धुवायला टाकण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. अशावेळी कपडे सुकण्यासाठी काय करावे याच्या झटपट काही सोप्या टिप्स जाणून घ्या…

पावसाळ्यात कपडे लवकर सुकावेत यासाठी काय कराल?

– मुख्य म्हणजे पावसाळ्यात कपडे योग्य पद्धतीने पिळून घ्यावेत. मशीन वापरत असाल तर उत्तम.

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
ow pressure water supply
दोन दिवस कमी दाबाने पाणी, मोरबे मुख्य जलवाहिनीवर आज १० तास देखभाल दुरुस्ती; नवी मुंबईसह कामोठे, खारघरलाही फटका
Cyber Criminal, Small Amount Fraud, target, Cyber Police, Maharashtra, Unwilling to Register, small fraud cases,
सायबर फसवणुकीच्या हजारो तक्रारींची नोंदच नाही; कोट्यवधी रुपये गुन्हेगारांच्या घशात

– कपडे थंड पाण्याने धुण्याऐवजी किंचित कोमट किंवा गरम पाण्याने धुवावेत. अगदीच शक्य नसल्यास कपडे धुवून झाल्यावर ते गरम पाण्यातून काढून पिळून वाळत घालावेत.

– कपडे वाळत घालताना त्यामध्ये पुरेसे अंतर ठेवा.

– शक्यतो शर्ट किंवा टी-शर्ट वाळत घालण्यासाठी हँगरचा वापर करा.

– घरात कपडे वाळत घालत असाल तर त्याच्या जवळ एक अगरबत्ती लावून ठेवा. (कपड्यांपासून दूर ठेवा) यामुळे कपड्यांना कुबट वास सुद्धा येत नाही.

– ज्या खोलीत कपडे वाळत घातले असतील त्या खोलीतली खिडकी उघडी ठेवावी. म्हणजे हवा खेळती राहील व कपड्यांना वास येणार नाही.

– कपडे ९० टक्के सुकल्यावर घडी करून ठेवण्याआधी इस्त्री करू शकता. पण अगदी ओल्या कपड्यांना इस्त्री करू नका. त्यामुळे कपडावर बराच परिणाम होतो.

– कपड्यांना पावसाळ्यात येणारा दुर्गंध घालवण्यासाठी कपडे धुताना त्या पाण्यात थोडं व्हिनेगर घालावे.

– ज्या खोलीत कपडे वाळायला घातले असतील तिथे एका पिशवीत मीठ भरून ठेवा. कपड्यातील ओलावा मीठ शोषून घेते.

– पावसाळ्यात कपड्यांची निवड करताना सिल्क किंवा नायलॉनला प्राधान्य द्या. कारण हे फॅब्रिक चटकन सुकते. कॉटनचे कपडे घालणे शक्यतो टाळा.

अगदी किंचित ओले कपडे घालूनही त्वचेवर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे येत्या चार महिन्यात या टिप्स तुम्हाला बऱ्याच कामी येऊ शकतात.