Covid 19 : करोना व्हायरसच्या वाढत्या प्रदुर्भावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांचा लॉकडाउन घेतला आहे. जगातील करोनाचा वाढता संसर्ग पाहाता भविष्यात भारतात या रोगाचा संसर्ग वाढण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे अनेकांच्या खिशाला झळ बसू शकते. या रोगावर सध्या कोणतीच गौळ्या-औषधं उपलबद्ध नाहीत. संसर्ग झाल्यानंतर सुरूवातीच्या काळातच हा रोग आटोक्यात येत असल्याचं आतापर्यंत समोर आलं आहे. पण उशीर झाल्यास या रोगावर तुर्तास तरी उपचार शक्य नाही. अशातच करोनावर उपचार करणायासाठी लागणाऱ्या पैशातून वाचण्यासाठी तुम्ही विमा संरक्षण घेऊ शकता.

फ्युचर जनराली इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (एफजीआयआय), वतीने खास कोरोनाव्हायरस ग्रुप इन्शुरन्स प्रोडक्ट सादर करण्यात आला आहे. या इन्शुरन्ससाठी कोणत्याही वयाची अट नाही. एक दिवसाच्या बाळापासून इन्शुरन्स घेऊ शखता. तसेच विमा रकमेकरिता वैद्यकीय चाचणीची आवश्यकता नाही. ज्या विमाधारक रुग्णांमध्ये कोविड-19 रोगाची लक्षणे/ किंवा संसर्ग आढळेल किंवा निदान होईल त्यांच्याकरिता या पॉलिसीमध्ये एकरकमी (लम्प सम) लाभ देऊ करण्यात आले आहेत. या विनाशकारी महामारीच्या पार्श्वभूमीवर हे विमाकमच एक दिवसाच्या बालकापासून ते ७५ वयाच्या वरिष्ठ नागरिकांसाठी आहे.

फ्युचर जनराली इंडिया इन्शुरन्सचे चीफ ऑपरेटींग ऑफिसर डॉ. श्रीराज देशपांडे म्हणाले की, “आपण सर्वांनी एकत्र येऊन विषाणू प्रादूर्भावापासून नागरिकांचा बचाव करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जास्तीत-जास्त बाधित व्यक्तींना मदत मिळू शकेल अशा पद्धतीने आम्ही कोरोनाव्हायरस ग्रुप इन्शुरन्स प्रोडक्ट डिझाईन केले आहे. पॉलिसीधारकाला कोविड-19 चा संसर्ग झाला असल्याची पुष्टी वैद्यकीय तज्ञांसमवेत सरकार/ डब्ल्यूएचओ प्रयोगशाळेने केल्यास 100% विमा लाभ एकरकमी स्वरुपात देण्यात येईल. आमच्या ग्राहकांना जास्तीत जास्त लाभ घेता यावा म्हणून आमचे हे उत्पादन खरेदी करताना कोणत्याही पूर्व-वैद्यकीय इतिहासाची किंवा प्रवास नोंदी सादर करण्याची आवश्यकता नाही.”

जर विमाधारक व्यक्ती कोविड-१९ संसर्गाची संशयित रूग्ण असल्यास तिला/त्याला सरकारी/ सरकारी मान्यताप्राप्त रुग्णालयात किमान १४ दिवस क्वारंटाईन करावे लागल्यास विम्याच्या ५०% एकरकमी स्वरुपात देण्यात येईल. तसेच एकूण विमा रकमेच्या १०% रक्कम अतिरिक्त लाभ प्रासंगिक खर्च म्हणून देण्यात येणार आहे.

करोना व्हायरसचा ग्रुप विम्याच्या माहितीसाठी आणि घेण्यासाठी इथं क्लीक करा