केंद्र सरकारनं घरगुती गॅस (LPG) सिलिंजरचे अनुदान दुपट्ट केलं आहे. LPG सिलेंडरवर लोकांना अनुदान मिळतेय हे अनुदान सरकारकडून सरळ बँक खात्यात जमा केलं जातये. पण तुमच्या खात्यात नियमित अनुदानाचे पैसे येतायेत ना? जर पैसे येत नसतील तर तुमचं गॅस कनेक्शन आधारशी लिंक नाही. लक्षात ठेवा बँक खातं आणि गॅस कनेक्शन आधारशी लिंक असायला हवं. त्याचवेळी तुम्हाला गॅसवर मिळाणाऱ्या अनुदानाचा लाभ घेता येईल. गैस कनेक्शनशी आधार लिंक करणे सोपं आहे. खालील पाच पद्धतीनं तुम्ही आधार-गॅस लिंक करू शकता.

समजा तुम्ही इंडेन कंपीनीच्या एलपीजी गॅस कनेक्शनचा वापर करत आहेत. इंडेन गॅस कनेक्शन आणि बँक खातं आधारशी लिंक केल्यानंतर लगेच तुम्हाला अनुदान मिळायला सुरूवात होईल. इंडेन गॅस कनेक्शनला आधारशी लिंक करण्याच्या पाच सोप्या पद्धती..

१. ऑफलाइन
२. ऑनलाइन
३. SMS
४. IVRS
५. कस्टमर केयर

१) ऑफलाइन

– LPG पासबुक, ई-आधार कार्ड आणि लिंक कराण्याचा फॉर्म आवश्यक
– http://mylpg.in/docs/unified_form-DBTL.pdf येथून तुम्ही फॉर्म डाउनलोड करू शकता.
– फॉर्म भरल्यानंतर आवशक कागदपत्रांसह संबधित एजेन्सीमध्ये जमा करा.
– जमा पावती घ्यायचा विसरू नका.
– तुम्ही अर्जात भरलेली माहिती तपासून पाहिल्यानंतर इंडेन गॅस कनेक्शनला आधार लिंक होईल.

२) ऑनलाइन

– मोबाइल क्रमांक रजिस्टर करा.

https://rasf.uidai.gov.in/seeding/User/ResidentSelfSeedingpds.aspx या संकेतस्थळावर जा.

– नवीन पेज ओपन झाल्यावर अवशक ती माहिती भरा.

– यामध्ये सुविधा (बेनिफीट )मध्ये LPG, तसेच स्कीमच्या नावात IOCL भरा तसेच वितरकाचं नावही भरा.

– तुमचा ग्राहक क्रमांक लिहा. आधार क्रमांक टाकण्यापूर्वी मोबाइल आणि मेल आयडी लिहा.

– सबमिट करा. मोबाइल किंवा मेलवर ओटीपी येईल. तो टाका आणि पुन्हा सबमिट करा. तुमचं आधार-गॅस कनेक्शन प्रक्रिया पुर्ण झाली.

३) SMS

– तुमचा मोबाइल कर्मांक रजिस्टर्ड केलेला हवा. नसल्यास आधी मोबाइल क्रमांक नोंदवा.

– तुमच्या नोंदणीकृत मोबाइलवरून तुम्हाला एक मेसेज करावा लागेल.

– तुमच्या जिलरचा नंबर वेबसाइटद्वारे माहिती करून घ्या.

– डिलरला पाठवत असलेल्या मेसजमध्ये IOC<गॅस वितरकाच्या फोनचा एसटीडी कोड><ग्राहक क्रमांक> लिहावं लागेल.

– http://indane.co.in/sms_ivrs.php या संकेतस्थळाद्वारे वितरकाचा क्रमांक शोधू शकता.

– आधार नंबर लिंक करण्यासाठी तुम्हाला एक मेसेज पाठवावा लागेल.

– त्यामध्ये UID<आधार नंबर> वितरकाच्या क्रमांकावर पाठवा.

– तुम्ही मेसेज पाठवल्यानंतर तुम्हाला कनेक्ट झाल्याचा एक मेसेज येईल.

४) IVRS
http://indane.co.in/sms_ivrs.php या संकेतस्थळावर जा
राज्य, जिल्हा आणि गॅस एजेन्सीची निवड करा.
त्यासमोर असलेल्या क्रमांकावर फोन करा आणि सर्व प्रक्रिया पुर्ण करा.

५)कस्टमर केअर
तुमच्या नोंदणीकृ क्रमांकावरून 1800 2333 555 या क्रमांकावर फोन करा. त्यानंतर आधार आणि कॅस कनेक्शनची सर्व माहिती द्या.