प्रत्येकाच्या आयुष्यात कर्जाचं (लोन) योगदान अमुल्य आहे. आपण अशा युगात आहे की कोणत्याही कामासाठी कर्ज महत्वाची भूमिका बजावतं. मग ते घर घेण्यापासून ते गाडी,मोबाइल खरेदीसाठीही कित्येकवेळा कर्जाची गरज पडते. पण,  कोणत्याही प्लॅनवर विचार करण्यापूर्वी कर्ज कसं आणि किती घ्यावं याबद्दल आधी विचार केला जातो. कारण, आजचं कर्ज उद्याची डोकेदुखी व्हायला नको. आर्थिक मंदीच्या काळात या गोष्टीचा आधिक सावध आणि खोलवर विचार करणं गरजेचं आहे. जाणून घेऊयात कर्ज घेण्यापूर्वीच्या प्लॅनिंगवेळी विचार करायच्या महत्वाच्या गोष्टी …

प्रमाणापेक्षा जास्त कर्ज नका घेऊ –

Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

इतर कोणत्याही घटकांपासून तुम्ही तुमच्या गरजा भागवू शकत असाल तर कर्ज घेण्याची गरज नाही. किंवा प्रमाणात कर्ज घ्या. तुम्ही कर्ज घेतले असेल तर तुमच्या कर्जाचा हप्ता तुमच्या महिन्याच्या कमाईच्या ४० टक्के रकमेपेक्षा आधिक नसावा. जर तुमच्या कमाईच्या ५० ते ७० टक्केंचा हप्ता असेल तर भविष्यात तुमची बचत होणं (सेव्हिंग) कठीण आहे.

शौक पूर्ण करण्यासाठी कर्ज घेऊ नका –

सध्या जगभरात आर्थिक मंदी असून कर्ज घेतना हजारवेळा विचार करणं गरजेचं आहे. फक्त गरजेसाठीच कर्ज काढा. शौक पूर्ण करण्यासाठी कर्ज काढू नका. गॅजेट्स किंवा इतर शौक पूर्ण करण्यासाठी घेतलेलं कर्ज भविष्यात तुम्हाला अडचण निर्माण करू शकते. इतकच नव्हे तर एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठीही कर्ज घेऊ नका. कर्जाची परतफेड करताना तुमच्या नाकी नऊ येईल.

सर्वात चांगल्या दराने कर्ज घ्या –

सर्वात चांगल्या दराने कर्ज घेता यावे यासाठी बँका आणि वित्तीय संस्थांद्वारे देऊ केल्या जात असलेल्या व्याज दरांची तुलना करा. विविध बँकांच्या व्याज दरांमध्ये मोठा फरक असू शकतो. तुम्ही कदाचित फ्लॅट दर शोधत असाल, कारण त्यामध्ये भरल्या गेलेल्या प्रत्येक ईएमआयनुसार कमी झालेली शिल्लक विचारात घेतली जात नाही. तथापि, हे दर कार्डावर स्वस्त दिसतात. उदाहरणार्थ, दोन वर्षांच्या अवधीसाठी घेतलेल्या एक लाख रुपयांच्या कर्जाच्या रकमेसाठी वार्षिक १४ टक्के व्याजदर असेल तर, घटत्या शिलकीनुसार तुम्ही एकूण १५,२३० रुपये व्याज भरता. ज्यामुळे याचा फ्लॅट दर वार्षिक ७.६ टक्के होतो. जर तुम्ही ईएमआयद्वारे परतफेड करत असाल तर, घटत्या शिलकीनुसार व्याज मोजले जाते. व्यक्तीगत कर्जे अनेकदा आधीच मंजूर झालेली असतात आणि चटकन मिळतात. तथापि, कोणतेही कर्ज घेताना परतफेडीची योजना तयार ठेवा. व्यक्तिगत कर्जांवरील व्याज दर खूप जास्त असतात त्यामुळे जर ते घेण्याची तुम्हाला तातडीची निकड नसेल तर ते घेऊ नका.

कमी व्याजदरला प्राधान्य द्या –

त्यातूनही तुम्ही कर्ज घ्यायचा विचार करत अशाल तर कमी व्याजदराला प्राधान्य द्या. तूम्ही कमी वेळेसाठीही कर्ज घेत असाल तरीही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. अनेकवेळी इएमआयच्या नावावर बँकेकडून ग्राहकांना अनेक ऑफर दिल्या जातात. पण त्याला भूलून न जाता सर्वौत्परीनं विचार करून कर्ज घ्यावं.

व्याजदरांवरील सूट पाहून कर्ज घेऊ नका –

व्याजावर मिळणारी सूट पाहून कर्ज घ्यायचा विचार करू नका. सरकारकडून अनेक कर्जांवर सूट दिली जाते. ते पाहून तूम्ही कर्ज घ्यायचा विचारही करू नका. असे अनेकजण आहेत जे कर्जावर सरकारी टॅक्स माफ होतो म्हणून कर्ज घेतात. उदाहरणार्थ…इनकम टॅक्स अॅक्ट 80EE नुसार गृहकर्ज आणि शिक्षणाच्या कर्जाच्या व्याजदारांवर सूट मिळते. पण फक्त व्याजदरांवर सूट मिळेतेय म्हमून कर्ज घेऊ नका.