News Flash

रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरचा पगार किती? जाणून घ्या

रिझर्व्ह बँकेने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पगाराची माहिती आपल्या वेबसाइटवर दिली आहे.

नव्या नोटांवर ज्यांची स्वाक्षरी आहे त्यांचा पगार किती हे माहितेय? रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदावर जो व्यक्ती असतो, ती व्यक्ती किती पगार घेत असेल, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्याचं उत्तर रिझर्व्ह बँकेनेच दिलं आहे. रिझर्व्ह बँकेने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पगाराची माहिती आपल्या वेबसाइटवर दिली आहे.

गव्हर्नरपदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीचा पगार डेप्युटी गव्हर्नर पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तीत्या पगारापेक्षा ३१ हजार ५०० रुपयांनी अधिक आहे. सध्या रिझर्व्ह बँकेत चार डेप्युटी गव्हर्नर आहेत. (विरल आचार्य यांच्यानंतर अजून त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती झालेली नाही.) या चौघांचा प्रत्येकी पगार २ लाख ५५ हजार रुपये (महागाई भत्ता आणि इतर काही रकमांचाही समावेश) आहे.

रिझर्व्ह बँकेनेच ३१ डिसेंबर २०१९ रोजील आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मासिक पगाराची माहिती जाहीर केली आहे. सध्या रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी शक्तिकांत दास आहेत. त्यांच्या हातात पगार येतो २ लाख ८७ हजार रुपये. विशेष म्हणजे यात महागाई भत्ता आणि इतर काही भत्त्यांचाही समावेश आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे, तीन वर्षांपूर्वी म्हणजेच जेव्हा उर्जित पटेल रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते, तेव्हा पगारांमध्ये मोठे बदल करण्यात आले होते. तेव्हापासून आतापर्यंत त्यात कोणताही बदल झालेला नाही. पटेल यांचा मूळ पगार २.५० लाख करण्यात आला होता. १ जानेवारी २०१६ पासून हा बदल करण्यात आला होता. सध्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचाही मूळ पगार २.५० लाख असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे.

गव्हर्नर शक्तिकांत दास यांना मिळणाऱ्या पगारात महागाई भत्ता किती?
रिझर्व्ह बँकेने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पगाराची माहिती आपल्या वेबसाइटवर दिली आहे. त्यानुसार गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा मूळ पगार २ लाख ५० हजार एवढा आहे. त्यावर त्यांना ३० हजार एवढा महागाई भत्ता मिळतो. इतर भत्त्यांच्या रूपात ७ हजार रूपये मिळतात. हे सारे मिळून गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या हातात २ लाख ८७ हजार एवढा पगार येतो.

डेप्युटी गव्हर्नरचा पगार किती असतो?
डेप्युटी गव्हर्नरचा मूळ पगार २ लाख २५ हजार एवढा आहे. त्यांना २७ हजार एवढा महागाई भत्ता मिळतो. शिवाय ३५०० रूपये इतर भत्त्यांचे मिळतात. हे सारे मिळून डेप्युटी गव्हर्नरच्या हाती येतात २ लाख ५५ हजार ५०० रूपये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2020 2:23 pm

Web Title: how much rbi governor shaktikanta das earn pkd 81
Next Stories
1 या सोप्या पद्धतीनं तपासा PF बॅलन्स
2 पाण्याचा थेंब गोलाकार का असतो?
3 फॉर्म 49A काय आहे? पॅन कार्डसाठी कसा कराल अर्ज?
Just Now!
X