News Flash

पर्यटकांसाठीही सेव्हिंग खाते, जाणून घ्या कसा कराल प्लॅन

एसबीआयचा हॉलिडे सेव्हिंग अकाउंटच्या मदतीने तुम्ही एखाद्या छानशा ट्रीपचे नियोजन करु शकता.

फिरायची आवड आहे पण सध्या पुरेसे पैसे नाहीत…अशी तुमची अवस्था असेल तरी अजिबात चिंता करु नका. तुमचे SBI मध्ये अकाऊंट असेल तरी पुरेसे आहे. एसबीआयच्या हॉलिडे सेव्हिंग अकाउंटच्या माध्यमातून अशा ग्राहकांना खास सुविधा मिळणार आहे. विशेष म्हणजे ट्रॅव्हल्स व्यवसायातील नामांकित कंपनी थॉमस कुक या टूरचे नियोजन करणार आहे. एसबीआयचा हॉलिडे सेव्हिंग अकाउंटच्या मदतीने तुम्ही एखाद्या छानशा ट्रीपचे नियोजन करु शकता. त्यासाठी या अकाऊंटद्वारे आधीपासून नियमित बचत केली जाणार आहे. ही बचत तुम्हाला ट्रीपच्या आधीपासून करता येणार आहे.

  • थॉमस कुकच्या वेबसाइटला भेट देऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने एसबीआयचे हॉलिडे सेव्हिंग अकाउंट उघडावे लागेल.
  • थॉमस कुक एचएसएच्या वेबसाइटला भेट द्या (https://www.thomascook.in/holidays/holiday-savings-account) आणि  एक पॅकेज निवडा.
  • आपण निवडलेल्या पॅकेजची एकूण रक्कम १३ हप्त्यात विभागली जाईल आणि आपल्याला पुढील एका वर्षात ई-आरडीद्वारे एसबीआय खात्यात १३ पैकी केवळ १२ महिने पैसे भरावे लागतील.
  •  या ई-आरडीवर आपल्याला व्याज देखील मिळेल.
  • मुदतपूर्तीच्या वेळी, ही रक्कम थॉमस कुकच्या खात्यात हस्तांतरित केली जाईल.
  • आपण निवडलेल्या पॅकेजनुसार, आपल्याला त्याप्रमाणे पैसे द्यावे लागतील.
  • एसबीआयच्या वेबसाईटनुसार, फक्त ९०० रुपये प्रति महिना १२ हप्त्यात देऊन थॉमस कुककडून सुट्टीचे पॅकेज मिळवू शकता.
  • जर काही कारणास्तव या ई-आरडीची संपूर्ण हप्ते तुम्ही भरु शकत नसाल, तर कालावधी संपल्यावर रक्कम तुमच्या खात्यात जमा केली जाईल.
  • फक्त एवढेच नव्हे तर, आपल्याला अचानक पैशांची गरज असेल तर आपण ई-आरडीची परतफेड करून या पैशाचा वापर करू शकता.
  • आपण एसबीआयचे हे हॉलिडे बचत खाते उघडल्यास फिरायला जायलाच हवे असे काही नाही. तर आपल्या गरजेनुसार आपण आपली योजना बदलू शकता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2020 1:20 pm

Web Title: how sbi holiday savings account works nck 90
Next Stories
1 MH-37 कुठला अन् MH 53 कुठला? पाहा राज्यातील शहरांच्या RTO नोंदणी क्रमांकाची यादी
2 IRCTC च्या वेबसाइटवर अकाउंट कसं बनवायचं?
3 एसबीआयमध्ये झिरो बॅलेन्स बचत खाते आहे? जाणून घ्या दहा गोष्टी
Just Now!
X