UPSC Civil Services exam Result : नागरी सेवा परीक्षा २०१९ चा निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (UPSC) जाहीर करण्यात आला झाला आहे. या परीक्षेत प्रदीप सिंह देशात पहिला आला आहे. तर महाराष्ट्रातून अभिषेक सराफ पहिला आला आहे. UPSC civil Service साठी झालेल्या या परीक्षेत देशभरातून ८२९ महत्त्वाकांक्षी युवक युवतींची निवड झाली आहे. UPSC 2019 चा निकाल http://www.upsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

लाखो उमेदवार ज्यांना आयएएस, आयपीएस अधिकारी व्हायची इच्छा असलेले तरुण-तरुणी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देतात. ही परीक्षा देशातील सर्वात आव्हानात्मक स्पर्धा परीक्षा मानली जाते. यंदा या निवड झालेल्या उमेदवारांपैकी ३०४ जनरल कॅटेगिरीतील, ७८ EWS, २५१ ओबीसी, १२९ अनुसूचित जाती आणि ६७ अनुसूचित जमाती कॅटेगिरीतील आहे.

Mom to be Deepika padukone shared embroidery work in social media during pregnancy
लवकरच आई होणाऱ्या दीपिका पदुकोणने सुरू केलं भरतकाम; अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली…
Marathi Joke
हास्यतरंग : मॅच लाव!…
Marathi Joke
हास्यतरंग : बायको शांत…
Vin Diesel shared photo with deepika padukone on social media
हॉलीवूड अभिनेता विन डिझेलने शेअर केला दीपिका पदुकोणसह फोटो, म्हणाला…

असा पाहा निकाल

– UPSC चा निकाल पाहण्यासाठी http://www.upsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जा.

Civil Services Examination, 2019 या लिंकवर क्लिक करा.

या पीडीएफमध्ये तुमचे नाव आणि रजिस्ट्रेशन नंबर पाहा

पीडीएफ फाइल डाउनलोड करून प्रिंटही काढू शकता.

 

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या या सेवा परीक्षेतून IAS, IPS आणि IFC, भारतीय टपाल सेवा, भारतीय टपाल सेवा, यूपीएससी नागरी सेवांद्वारे भारतीय व्यापार सेवा यासह इतर सेवांसाठी निवड केली जाते. ही परीक्षा तीन टप्प्यांमध्ये घेतली जाते. यात प्रारंभिक, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे तीन टप्पे असतात.