केंद्र सरकारनं आधारकार्ड आणि पॅनकार्ड लिंक करणं अनिवार्य केलं आहे. ३१ डिसेंबर २०१९ रोजी पॅन-आधार लिंक करण्याची तारिख सरकारने वाढवली. सध्या ३१ मार्च २०२० पर्यंत आधार-पॅन लिंक करण्याची मुदत सरकानं दिली आहे. वारंवार पॅन-आधार लिंक करण्याचं आवाहन सरकारनं करूनही अनेकांनी अद्यापही काही नागरिकांनी अधार-पॅन लिंक केलेलं नाही. ज्यांनी अद्याप आधार-पॅन लिंक केलेलं नाही, अशा नागरिकांनी तात्काळ आपले आधार-पॅन लिंक करुन घ्यावे. त्यासाठी काही सोप्या टिप्स आहेत. जाणून घेऊयात ऑनलाइन आधार-पॅन कसं लिंक केलं जातं.

१. आयकर विभागाच्या वेबसाईटवर (https://www.incometaxindiaefiling.gov.in/home) डाव्या बाजूला ‘link adhaar’ या पर्यायावर क्लिक करावं. मात्र यासाठी आयकर विभागाच्या साईटवर तुमचे लॉग इन आयडी आणि पासवर्ड गरजेचा आहे.

२. ‘link adhaar’ या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म दिसेल. ज्यावर तुम्हाला पॅन, आधारकार्ड नंबर, आधार कार्डवरील तुमचं नाव अशी दिलेली माहिती भरावी लागेल.

३. ही माहिती भरताना तुम्हाला ‘ i have only year of birth in adhaar card’ चा पर्याय दिसेल. जर तुम्ही आधारकार्डवर फक्त जन्मवर्षच भरलं असेल तर या पर्यायावर टिक करा.

४. ही माहिती भरुन झाल्यानंतर खाली कोड दिलेला असेल ज्याला Captcha Code असं म्हणतात. तो व्यवस्थित बघून जसाच्या तसा भरा.

५. ही माहिती पूर्णपणे भरून झाल्यानंतर खाली ‘link adhaar’ चा पर्याय दिलेला असेल त्यावर क्लिक करा जेणेकरून तुमचं आधार- पॅन लिंक होऊ जाईल.

६. 567678 किंवा 56161 यावर एसएमएस पाठवून आधार-पॅन लिंक झाल्याची माहिती मिळवता येते. UIDPAN<space><आधार क्रमांक><space><पॅन क्रमांक> हा मेसेज वर दिलेल्या क्रमांकावर पाठवा. त्यानंतर तुम्हाला आधार पॅन लिंक झाले की नाही हे समजेल.

फायदे – तुमचा पॅन क्रमांक आधार क्रमांकाशी लिंक आहे तर तुम्हाला नवे बँक खाते सहजासहजी उघडता येणे शक्य आहे. तसेच आयटीआर भरण्यासही अडचण येणार नाही. नवे डेबिट कार्ड अथवा क्रेडिट कार्ड मिळवणेही सोयीस्कर होणार आहे

पगार रोखला जाण्याची शक्यता – जर दिलेल्या मुदतीत तुम्ही पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नाही तर तुमचा पगारही रोखला जाऊ शकतो. म्हणजेच पॅन कार्ड रद्द होण्यामुळे तुमचा पगार तुमच्या खात्यात जमा होऊ शकणार नाही. कारण कंपन्या करमर्यादेच्यावर असणाऱ्या पगारावर टीडीएस कापून घेतात. मात्र, तुमच्याकडील पॅन क्रमांक रद्द झाल्यास त्यांना हे करता येणार नाही. ज्यामुळे तुमच्या पगारावर संकट येऊ शकते. त्यामुळे जर तुमच्याकडे पॅन आणि आधार क्रमांक दोन्हीही असतील तर त्याला लिंक करुन घेणेच हिताचे ठरणार आहे.