पाण्याला जीवन असे म्हणतात. पाणी अनेक विकारांसाठी उपयुक्त औषध आहे. पाण्याच्या साहाय्याने रोग निवारण करण्याच्या पद्धतीला जलचिकित्सा किंव जल उपचार (हायड्रोपॅथी) असे म्हणतात. या उपचार पद्धतीत थंड आणि गरम पाण्याचा वापर करून विकारांवर उपचार करता येतात.

या उपचार पद्धतीचा शोध १८२९ मध्ये युरोपमधील ऑस्ट्रिया या देशात लागला. ऑस्ट्रियातील साइलीजा येथील विन्सेंट प्रीसनिट्स नावाच्या शेतकऱ्यांनी सर्वप्रथम या पद्धतीचा व्यावहारिक उपयोग केला. त्यानंतर अनेक डॉक्टर, वैद्यकीय तज्ज्ञांनी या पद्धतीचा वापर केला. सध्या जपानमध्ये ही उपचार पद्धती खूपच प्रसिद्ध आहे. या उपचार पद्धतीद्वारे आतडय़ाचे शुद्धीकरण केले जाते.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
loksatta Health Special article, relationship between, skin disorders, diabetes
Health Special: त्वचाविकार आणि मधुमेह नेमका काय संबंध?
Eating walnuts on an empty stomach in the morning
अक्रोड खाताना ‘ही’ योग्य वेळ, पद्धत व प्रमाण पाळल्यास मेंदू होईल तल्लख; तुमच्या शरीरात काय बदलेल?
How to Remove Hair from Your Upper Lip Naturally
Dark Upper Lips: आता अप्पर लिप्स करण्यासाठी पार्लरची गरज नाही; या ४ घरगुती उपायांनी मिळवा सुटका

गरम, कोमट आणि थंड पाण्याचा वापर या पद्धतीत केला जातो. या पद्धतीत थंड व गरम पाणी प्यायल्याने पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. त्याशिवाय थंड व गरम पाण्याने स्नान केल्याने अनेक विकारांवर नियंत्रण मिळवता येते. यामध्ये स्नानाचे विविध प्रकार आहेत. त्याशिवाय थंड व गरम पाण्याने शेक देऊन उपचार केले जातात.