भारतीय रेल्वेने एक महत्वाचं पाऊल उचललं आहे. आज भारतीय रेल्वेमार्फत किसान रेल्वेगाडीची सुरुवात करण्यात आली आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शुक्रवार या किसान रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे मंत्री छगन भुजबळही उपस्थित होते. या रेल्वेतून फळ आणि पाले-भाज्यासारख्या सामानाची नेआण करण्यात येणार आहे. जाणून घेऊयात ही ट्रेन नेमकी काय आहे आणि याचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार…

कुठून कुठपर्यंत?
किसान रेल्वे गाडी महाराष्ट्र ते बिहार या राज्यात धावणार आहे. महाराष्ट्रातील देवळाली स्थानकातून सकाळी ११ वाजता ही रेल्वे रवाना होणार आणि बिहारच्या दानापुर स्थानकापर्यंत जाणार आहे.

HC orders Mumbai Municipal Corporation to devise alternative policy for unlicensed hawkers
विनापरवाना फेरीवाल्यांसाठी पर्यायी धोरण आखा, उच्च न्यायालयाचे मुंबई महानगरपालिकेला आदेश
BMC, 103 aapla dawakhana sunstroke, cold room for Sunstroke, Sets Up 2 Bed Reserves sunstroke, 14 hospitals sunstroke, bmc prepares for sunstroke, mumbai municioal corporation, mumbai news, sunstroke news, balasaheb thackeray aapla dawakhana, marathi news,
उष्माघाताचा सामना करण्यासाठी आपला दवाखानाही सज्ज, १०३ दवाखान्यांमध्ये वातानुकूलनबरोबरच कुलरची व्यवस्था
pmp and rto taken joint action against 1620 errant rickshaw drivers
बसस्थानक परिसरात रिक्षा उभी करणाऱ्या १,६२० चालकांवर कारवाई, पीएमपी, आरटीओची मोहीम
private bus fare mumbai to konkan marathi news, mumbai to konkan private bus marathi news
मुंबईस्थित कोकणवासीय शिमग्यानिमित्त गावी रवाना, खासगी बस कंपन्यांकडून अव्वाच्या सव्वा तिकीट दर आकारणी

वैशिष्ट्ये काय?
किसान रेल्वे गाडीत रेफ्रिजरेटेड कोच लावण्यात आले आहेत. १७ टनपर्यंत माल वाहून नेहण्याची क्षमता या ट्रेनमध्ये आहे. याचं डिजायनही हटके आहे. कपूरथला येथील रेल्वे कारखान्यातून या रेल्वेच्या बोगी तयार करण्यात आल्या आहेत. यामधील कंटेनर फ्रीजसारखे असतील. ही रेल्वे म्हणजेच चालते फिरते कोल्ड स्टोरेज असणार आहे. या रेल्वेगाडीत शेतकऱ्यांच्या पालेभाज्या, भळे, मासे, मांस आणि दूधासारख्या पदार्थांना ठेवण्यात येणार आहे.

वेळापत्रक काय?

महाराष्ट्र-बिहार या मार्गावर किसान रेल्वेगाडी आठवड्यातून एकदा धावेल. महाराष्ट्रातील नाशिकमधील देवळाली स्थानकातून सकाळी ११ वाजता रवाना होणार आहे. दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.४६ वाजता पटनाजवळील दानापुर स्थानकात पोहचेल. या रेल्वेगाडीला महाराष्ट्रातून बिहारमध्ये पोहचण्यासाठी ३२ तासांचा कालवधी लागणार आहे.


कोणत्या स्थानकावर थांबणार? –
देवळाली ते दानापुर या स्थानकादरम्यान एक हजार ५१९ किमी ट्रेन धावेल. देवळाली स्थानकातून निघाल्यानंतर नाशिक रोड, मनमाड, जळगांव, भुसावळ, बुरहानपुर, खंडवा, इटारसी, जबलपुर, सतना, कटनी, मणिकपुर, प्रयागराज, पं दीनदयाल उपाध्याय नगर आणि बक्सर या स्थानकावर थांबणार आहे.