28 February 2021

News Flash

LIC ची नवी पॉलिसी : १३०२ रुपयांची गुंतवणूक करा आणि ६३ लाख मिळवा; जाणून घ्या अधिक माहिती

तीन महिन्यांच्या बाळापासून ते ५५ वर्षांच्या व्यक्तींपर्यंत कोणाच्याही नावे काढता येईल पॉलिसी

फाइल फोटो (फोटो सौजन्य: रॉयटर्स)

तुम्ही एलआयसी म्हणजेच भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या एखाद्या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर एक नवीन पॉलिसी बाजारामध्ये दाखल झाली आहे. या पॉलिसीमध्ये १३०२ रुपये गुंतवणूक केल्यानंतर खातेदारांना ६३ लाखांपर्यंत रक्कम परत मिळू शकते. एलआयसीने या पॉलिसीचे नाव जीवन उमंग पॉलिसी असं ठेवलं आहे. तीन महिन्यांच्या बाळापासून ते ५५ वर्षांच्या व्यक्तींपर्यंत कोणत्याही व्यक्तीच्या नावे ही पॉलिसी काढता येणार आहे. एलआयसीच्या जीवन उमंगचे वैशिष्ट्य म्हणजेच प्रिमियम संपण्याआधी सर्व रक्कम भरल्यास ज्या व्यक्तीच्या नावाने विमा काढण्यात आला आहे त्याला निश्चितपणे किमान रक्कम परत केली जाईल.

कसं आहे हे गणित?

एलआयसीच्या या पॉलिसीअंतर्गत तुम्ही महिन्याला १३०२ रुपयांची गुंतवणूक करत आहात तर तुम्ही वर्षाला १५ हजार ६२४ रुपये जमा करता. १५ हजार ५२४ ही रक्कम ३० वर्षांसाठी ठेवली तर एकूण रक्कम होते चार लाख ६८ हजार ७२० रुपये. ३१ व्या वर्षापासून दर वर्षी खातेदाराला ४० हजार रुपये मिळतील. याच हिशोबाने १०० वर्ष वयापर्यंतच्या रिटर्न्सचा हिशोब लावला तर ४० हजार गुणिले ७० केल्यास २८ लाख रुपये होतात. या पॉलिसीमध्ये एकूण नफा हा २३ लाख ४१ हजार ६० रुपयांचा असेल. ही पॉलिसी ज्या व्यक्तीच्या नावे आहे तिला १०० वर्ष वयापर्यंतची सुरक्षा देते. ज्या व्यक्तीच्या नावे विमा काढला आहे ती १०१ वर्षांची झाली तर तिला ६२ लाख ९५ हजार रुपये दिले जातील.

पॉलिसीची वैशिष्ट्ये काय :

> वयाच्या शंभराव्या वर्षापर्यंत सुरक्षा दिली जाणार
> पॉलिसीचा कालावधी संपला किंवा पॉलिसी ज्याच्या नावर काढली आहे त्याचा मृत्यू झाल्यास एक रकमी पैसे दिले जाणार
> ९० दिवसांच्या बलाकापासून ५५ वर्षांच्या व्यक्तीपर्यंत कोणाच्याही नावे ही पॉलिसी काढता येते
> प्रीमियम पेईंग टर्म म्हणजेच पीपीटी १५, २०, २५ आणि ३० वर्ष निश्चित करण्यात आलाय
> प्रीमियम संपण्याआधी सर्व रक्कम भरल्यास पॉलिसी ज्या व्यक्तीच्या नावाने आहे त्याला गॅरंटीसहीत किमान रक्कम परत केली जाणार
> जीवन विमाचा ८ टक्के दराने आयुष्यभर रिटर्न मिळत राहणार
> थोडी गुंतवणूक केल्यास या पॉलिसीमधून आयुष्यभर रिटर्न मिळू शकता.

या पॉलिसीसंदर्भातील अधिक माहिती- https://www.licindia.in/Products/Insurance-Plan/LICs-Jeevan-Umang या लिंकवर उपलब्ध आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2021 8:35 am

Web Title: lic insurance plan lics jeevan umang policy scsg 91
Next Stories
1 समजून घ्या : हिमनदीला आलेला पूर म्हणजे काय? का आणि कसा होतो याचा उद्रेक?
2 समजून घ्या : Clubhouse काय आहे? ते सध्याचं सगळ्यात ‘हॉट’ सोशल अ‍ॅप का आहे?
3 Budget 2021: नेत्याची खिल्ली उडवण्याच्या नादात झाला ‘बजेट’ शब्दाचा जन्म
Just Now!
X