LIC Jeevan Anand policy : देशातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी भारतीय जीवन विमा महामंडळ (एलआयसी) नागरिकांसाठी विविध पॉलिसी अंमलात आणते. या पॉलिसी वेगवेगळ्या वर्गाला समोर ठेऊन तयार करण्यात आलेल्या असतात. लहानांपासून ज्येष्ठापर्यंत एलआयसीमध्ये विविध प्रकारच्या पॉलिसी आहेत. ग्राहकांसाठी भविष्यात मोठी रक्कम जमा होईल अशा पद्धतीनं या पॉलिसींची रचना केलेली असते. एलआयसी ग्राहकां टर्म प्लॅन, जीवन वीमा आणि एंडोमेंट प्लॅनसारख्या इतर पॉलिसी देते. आज आपण एलआयसीच्या जीवन आनंद पॉलिसीबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये दररोज १२९ रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर अखेरीस ६६ लाख रुपये मिळणार आहे. त्यासोबत अनेक फायदेही या स्कीममध्ये आहेत. या पॉलिसीसोबत एलआयसीकडून १५ लाख रुपयांचा रिस्क कव्हर देण्यात येतो. ही एक पार्टिसिपेटिंग पॉलिसी आहे जी गुंतवणुकीला सुरक्षा तर देतेच शिवाय बचतही करते.

या पॉलिसीअंतर्गत रिस्क कव्हरही दिलं जातं. पॉलिसीच्या मॅच्योरिटीवर सम एश्योर्डसह इतर लाभही दिले जातात. एंडॉवमेंट पॉलिसीमध्ये गुंतवूणूक आणि विमा दोन्हीचा लाभ पॉलिसीधारकाला मिळतो. पॉलिसी १५ ते ३५ वर्ष टर्मसोबत येते. ही पॉलिसी घेण्यासाठी कमीतकमी २८ वर्ष वयाची अट आहे.

ही पॉलिसी अतिरिक्त बोनस सुविधा , तरलता आणि निव्वळ गुंतवणूकसाठी लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. एलआयसीची सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या पॉलिसीपैकी ही एक आहे. कमीतकमी सम एश्योर्ड एक लाख रुपये असून आधिकची मर्यादा नाही. आपल्या सोयीप्रमाणे आपण निवड करु शकतो.

दिवसाला १२९ रुपये गुंतवल्यानंतर ६६ लाख कसे मिळतील? हे आपण एका उदाहरणासह पाहूयात.

वय – 27 वर्ष
एडीडीएबी: 1500000
डेथ सम एश्योर्ड: 1875000
बेसिक सम एश्योर्ड: 1500000

पहिल्या वर्षीचं प्रिमियम 4.5 टक्के टॅक्ससह

वार्षिक: 48326 (46245 + 2081)
अर्धवार्षिक: 24426 (23374 + 1052)
त्रैमासिक: 12345 (11813 + 532)
मासिक : 4115 (3938 + 177)
वायएलवाय मोड सरासरी प्रीमियम/प्रतिदिवस: 132

पहिल्या वर्षीचं प्रिमियम भरल्यानंतर कमी झालेल्या टॅक्ससह-
वार्षिक: 47286 (46245 + 1041)
अर्धवार्षिक: 23900 (23374 + 526)
त्रैमासिक: 12079 (11813 + 266)
मासिक : 4027 (3938 + 89)
वायएलवाय मोड सरासरी प्रीमियम/प्रतिदिवस : 129

एकूण अनुमानित प्रीमियम: 1,56,1478 रुपये

मॅच्योरिटीच्या वेळी एकूण अनुमानित रिटर्न:
सन एश्योर्ड: 1500000
बोनस: 24,25,500
फाइनल एडिशनल बोनस: 27,00,000

मॅच्योरिटीच्या वेळी एकूण अनुमानित रिटर्न: 6625500 आणि लाइफटाइम 15,00,000 रुपयांचं रिस्क कव्हर..

आता समजा, एखाद्या व्यक्तीनं २७ व्या वर्षी या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. आणि तो ३३ वर्षांच्या टर्म प्लॅनसोबत १५ लाख सम एश्योर्ड प्लानला फिक्स करतो. अशा परिस्तितीत त्याला दिवसाला १२९ रुपये एलआयसीच्या या योजनेत भरावे लागतील. ३३ वर्ष या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर पॉलिसीधारकाला १५ लाख रुपये एसए, २४ लाख २५ हजारांचा बोनस आणि २७ लाख रुपये अंतिम एडिशनल बोनसच्या स्वरुपात मिळतील. ६० वर्षांच्या वयात त्या व्यक्तीला ६६ लाख २५ हजार ५०० रुपये मिळतील.