LIC Jeevan Lakshya Policy : देशातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी भारतीय जीवन विमा महामंडळ (एलआयसी) नागरिकांसाठी विविध पॉलिसी आंमलात आणते. या पॉलिसी वेगवेगळ्या वर्गाला समोर ठेऊन तयार करण्यात आलेल्या असतात. लहानग्यांपासून ज्येष्ठापर्यंत एलआयसीमध्ये विविध प्रकारच्या पॉलिसी आहेत. ग्राहकांना भविष्यात मोठी रक्कम जमा होईल अशा पद्धतीनं या पॉलिसींना डिजाइन केलेले आहे. एलआयसी ग्राहकां टर्म प्लॅन, जीवन वीमा आणि एंडोमेंट प्लॅनसारख्या इतर पॉलिसी देते. आज आपण एलआयसीच्या जीवन लक्ष्य पॉलिसीबद्दल जाणून घेणार आहोत.. या पॉलिसीमध्ये दिवसाला ११४ रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर तब्बल २६ लाख रुपयांचा परतावा मिळतो.

एलआयसीची जीवन लक्ष्य ही पॉलिसी सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या पॉलिसीपैकी एक आहे. ही एक ट्रेडिशनल बचत योजना आहे जी गुंतवणुकीला सुरक्षा तर देतेच शिवाय बचतही करते. या योजनेच्या दरम्यान पॉलिसीधरकाला मिळणारा मृत्यू लाभ वार्षिक इंस्टालमेंटमध्ये दिला जातो. या पॉलिसीला विकत घेण्यासाठी कमीत कमी १८ वर्ष व जास्तीत जास्त ५० वर्ष वयाची अट ठेवण्यात आली आहे. या पॉलिसीचा मॅच्योरिटी पीरिअड 65 वर्ष आहे. तसेच ही पॉलिसी शेअर मार्केटला जोडलेली नाहीय

mutual fund, market, investment, Assets, small cap
स्मॉल कॅप फंडांमधील मालमत्ता २.४३ लाख कोटींवर
400 lakh crore market cap milestone of Mumbai Stock Exchange
विश्लेषण : ७५ हजारांचे शिखर… ४०० लाख कोटींचे बाजारभांडवल… शेअर बाजार आणखी किती तेजी दाखवणार?
loss firms donate electoral bonds
तोट्यात असणाऱ्या ३३ कंपन्यांकडून ५४२ कोटी रुपयांचे रोखे दान, एकट्या भाजपाला मिळाले तब्बल…
maharashtra registered a record revenue collection from registration and stamp duty
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने केला विक्रम

हा एक लिमिटेड प्रिमियम पेमेंट प्लॅन आहे. यामध्ये पॉलिसीधारकला निवडलेल्या टर्म प्लानपासून तीन वर्षांपर्यंत प्रिमियम भरावं लागते. आता प्रश्न असाय की, या पॉलिसीअंतर्गत दररोज कितीदिवस ११४ रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर २६ लाख रुपयांचा परतावा कसा मिळतो. हे एका उदाहरणासह जाणून घेऊयात…

वय : 25
टर्म: 25
प्रिमियम पेइंग टर्म: 22
डीएबी: 1000000
डेथ सम एश्योर्ड: 1100000
बेसिक सम एश्योर्ड: 1000000

पहिल्या वर्षीचं प्रिमियम 4.5 टक्के टॅक्ससह
वार्षिक: 42819 (40975 + 1844)
अर्धवार्षिक: 21639 (20707 + 932)
त्रैमासिक: 10934 (10463 + 471)
मासिक : 3645 (3488 + 157)
वायएलवाय मोड सरासरी प्रीमियम/प्रतिदिवस: ११७

पहिल्या वर्षीचं प्रिमियम भरल्यानंतर कमी झालेल्या टॅक्ससह-
वार्षिक: 41897 (40975 + 922)
अर्धवार्षिक: 21173 (20707 + 466)
त्रैमासिक: 10698 (10463 + 235)
मंथली: 3566 (3488 + 78)
वायएलवाय मोड सरासरी प्रीमियम/प्रतिदिवस : ११४
एकूण अनुमानित प्रीमियम: 9,22,656 रुपये

मॅच्योरिटीच्या वेळी एकूण अनुमानित रिटर्न:
एसए : 1000000
बोनस: 1225000
फाइनल एडिशनल बोनस: 4,50,000
मॅच्योरिटीच्या वेळी एकूण अनुमानित रिटर्न – 26,75,000 रुपये

जर एखादा व्यक्ती वयाच्या २५ व्या वर्षी २५ वर्षाचा प्लॅनसह 10,00,000 रुपयांचा सम एश्योर्ड असणारा पर्याय निवड केला. तर २२ वर्षांपर्यंत त्या व्यक्तीला दररोज ११४ रुपये भरावे लागतील. यामध्ये पॉलिसीधारकाला मॅच्योरिटीवर 26,75,000 रुपये परतावा मिळतो. ज्यामध्ये 10,00,000 रुपयांचा सम एश्योर्ड, 12,25,000 रुपयांचा बोनस आणि 4,50,000 रुपयांचा फायनल एडिशनल बोनस असतो.