Life Insurance Corporation : देशातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी भारतीय जीवन विमा महामंडळ (एलआयसी) नागरिकांसाठी विविध पॉलिसी आंमलात आणते. या पॉलिसी वेगवेगळ्या वर्गाला समोर ठेऊन तयार करण्यात आलेल्या असतात. लहानग्यांपासून ज्येष्ठापर्यंत एलआयसीमध्ये विविध प्रकारच्या पॉलिसी आहेत. ग्राहकांना भविष्यात मोठी रक्कम जमा होईल अशा पद्धतीनं या पॉलिसींना डिजाइन केलेले आहे. एलआयसी ग्राहकां टर्म प्लॅन, जीवन वीमा आणि एंडोमेंट प्लॅनसारख्या इतर पॉलिसी देते. आज आपण एलआयसीच्या जीवन लक्ष्य  पॉलिसीबद्दल जाणून घेणार आहेत. ज्यामध्ये दररोज १५४ रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर अखेरसी १९ लाख ७० हजार रुपये मिळणार आहे. त्यासोबत अनेक फायदेही या स्कीममध्ये आहेत.

या पॉलिसीमध्ये मॅच्योरिटी पीरियडच्या अखेरीस एकमुश्त पैसीही दिलेत जातात. मग पॉलिसीधारक जिवंत असो किंवा न नसो. तसेच ही पॉलिसी घेतली असेल आणि निधन झाल्यास पॉलिसीधारकाच्या परिवाराला याचा मोठा फायदा होतोय.

१८ ते ५० वर्षांपर्यतचा व्यक्ती ही पॉलिसी विकत घेऊ शकतो. या पॉलिसीची कमीतकमी गुंतवणुकीची मर्यादा एक लाख रूपये असून जास्तीत जास्त याची कोणतही मर्यादा नाही.

आता प्रश्न असा आहे की दररोज १५४ रुपयांची गुंतवणूक करून आपल्याला १९ लाख ७० हजार कसे मिळणार. तुमच्या १५४ दररोज किती दिवस भरायचे हा प्रश्नही असेल. हा सर्व प्रकार आपण एका उदाहरणासह समजून घेऊयात….

वय : ३० वर्ष
टर्म : २० वर्ष
पीपीटी : १७
डीएबी: १०,०००००
डेथ सम एश्योर्ड: ११,०००००
बेसिक सम एश्योर्ड: १०,०००००

पहिल्या वर्षाचं प्रिमीयम 4.5 टक्के टॅक्ससह
वार्षिक: 57771 (55283 + 2488)
अर्धवार्षिक: 29191 (27934 + 1257)
त्रैमासिक: 14748 (14113 + 635)
मासिक : 4916 (4704 + 212)
वायएलवाय मोड सरासरी प्रिमीयम/प्रतिदिन : 158

पहिल्या वर्षाचे प्रिमियम भरल्यानतर…
वार्षिक: 56527 (55283 + 1244)
अर्धवार्षिक: 28563 (27934 + 629)
त्रैमासिक: 14431 (14113 + 318)
मासिक – (4704 + 106)
वायएलवाय मोड सरासरी प्रिमीयम/प्रतिदिन : 154

एकूण अनुमानित देण्याचा प्रिमियम : 962203 रुपये
बोनस: 247000

मॅच्योरिटी प्रत्येक अनुमानित रिटर्न
एसए : 1000000
बोनस: 900000
एफएबी: 70000

मॅच्योरिटीच्या वेळी एकूण रिटर्न देण्याची रक्कम –
१९ लाख ७० हजाराच्या उदाहरणानुसार जर एखादा व्यक्ती ३० व्या वर्षी २० वर्षाचा टर्म प्लान आणि १०,००००० सम एश्योर्डचा विकल्प निवडत असेल तर १७ वर्षांपर्यंत त्या व्यक्तीला दररोज १५४ रुपयांची रक्कम भरावी लागेल. असे एकूण त्या व्यक्तीला ९ लाख ६२ हजार २०३ रुपये भरावे लागतील. त्यानंतर ही रकम मॅच्योरिटीवर १९ लाख ७० हजार रुपये होईल.